Tax Saving: टॅक्स सेव्हिंगमध्ये इन्वेस्टमेंट केली नसेल तर तुम्ही घाई करायला हवी. कारण तुमच्याकडे अवघे 15 दिवस शिल्लक आहेत. टॅक्स बचत गुंतवणूक करण्याची अखेरची तारीख 31 मार्च 2023 आहे. टॅक्स वाचवण्यासाठी तुम्हाला जर गुंतवणूक करायची असेल तर त्वरित करुन घ्या. जुन्या टॅक्स स्लॅबमधून तुम्ही कर भरल्यास कलम 80C, 80D, 80TTB, 80E, 80G अंतर्गत तुम्हाला सवलत मिळेल. टॅक्स भरण्यात तुम्हाला सूट मिळेल. आज आपण काही खास गुंतवणूक स्किमविषयी जाणून घेणार आहोत.
पब्लिक प्रोव्हिडेंट फंड :ब्लिक प्रॉव्हिडेंट फंड(PPF) मध्ये केलेल्या गुंतवणुकीवर कलम 80C अंतर्गत कर सूट उपलब्ध आहे. या योजनेत 1.5 लाख रुपयांपर्यंतची सूट मिळू शकते. तुम्हाला हवे असल्यास, तुम्ही एका वर्षात एकाच वेळी गुंतवणूक करू शकता. PPF वर 7.1 टक्के रिटर्न मिळत आहे.
नॅशनल पेन्शन सिस्टम : कलम 80CCD (1B) अंतर्गत, राष्ट्रीय पेन्शन प्रणाली (NPS) मध्ये 50 हजार रुपयांपर्यंतच्या वार्षिक गुंतवणुकीवर स्वतंत्र कर कपात उपलब्ध आहे. हा फायदा 1.5 लाख रुपयांपर्यंतच्या गुंतवणुकीवर 80C अंतर्गत लाभाव्यतिरिक्त आहे. तुमची इच्छा असल्यास 31 मार्चपर्यंत गुंतवणूक करून तुम्ही या अतिरिक्त कर सवलतीचा लाभ घेऊ शकता. नोकरी बदलल्याने अनेक EPF अकाउंट झालेय? लगेच करा मर्ज, अन्यथा...
टॅक्स सेव्हिंग एफडी : कलम 80C अंतर्गत 5 वर्षांच्या लॉक-इन कालावधीसह टॅक्स सेविंग फिक्स्ड डिपॉझिटमध्ये (FDs) 1.5 लाख रुपयांपर्यंतच्या गुंतवणुकीवर देखील कर सूट उपलब्ध आहे. गुंतवणूक करण्यापूर्वी, तुम्ही ज्या एफडीमध्ये गुंतवणूक करत आहात ती टॅक्स सेव्हिंग करण्यास सक्षम आहे की नाही याची संपूर्ण माहिती बँकेकडून मिळवा. रिझर्व्ह बँकेने रेपो दरात वाढ केल्यानंतर बँकांनीही एफडीवरील व्याजदरात वाढ केली आहे. 5 वर्षात मालामाल व्हायचंय? पोस्ट ऑफिसची 'ही' स्किम आहे बेस्ट
इक्विटी लिंक्ड बचत योजना : टॅक्स बचत करण्यासाठी इक्विटी लिंक्ड सेव्हिंग स्किम देखील लास्ट मिनिटात टॅक्स वाचवण्यासाठी चांगला पर्याय आहे. यामध्ये बँकेच्या एफडीपेक्षा जास्त रिटर्न मिळतो. टॅक्स सेव्हिंग ELSS बद्दल एक खास गोष्ट म्हणजे त्याचा लॉक-इन कालावधी फक्त 3 वर्षांचा आहे. ELSS मध्ये SIP आणि एकरकमी गुंतवणूक करता येते. 2 हजारांचं कर्ज घेऊन सुरु केला बांबू प्रोडक्ट्सचा व्यवसाय, आता करतेय लाखोंची कमाई!
हेल्थ इंश्योरेन्स पॉलिसी : आरोग्य विमा पॉलिसी म्हणजेच आरोग्य विमा खरेदी करण्यावर कलम 80D अंतर्गत कर सूट उपलब्ध आहे. 60 वर्षांपेक्षा कमी वयाच्या लोकांना 25,000 रुपयांपर्यंतच्या प्रीमियमवर डिडक्शनचा लाभ मिळतो, परंतु 60 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांना 50,000 रुपयांपर्यंतच्या प्रीमियमवर सूट मिळते. या कलमांतर्गत, तुम्ही तुमचा आणि तुमच्या ज्येष्ठ नागरिक पालकांसाठी आरोग्य विमा घेऊन टॅक्स सूट मिळवू शकता. झिरो बॅलेन्सवर असं ओपन करा अकाउंट; पहिल्याच दिवशी मिळेल पासबुक, चेकबुकसह एटीएमकार्ड!