जाहिरात
मराठी बातम्या / मनी / झिरो बॅलेन्सवर असं ओपन करा अकाउंट; पहिल्याच दिवशी मिळेल पासबुक, चेकबुकसह एटीएमकार्ड!

झिरो बॅलेन्सवर असं ओपन करा अकाउंट; पहिल्याच दिवशी मिळेल पासबुक, चेकबुकसह एटीएमकार्ड!

झिरो बॅलेन्स बँक अकाउंट कसं उघडावं

झिरो बॅलेन्स बँक अकाउंट कसं उघडावं

वेलकम किट अंतर्गत जवळपास सर्वच ग्राहक सर्वच सरकारी बँकांमध्ये काही तासांमध्ये आपलं अकाउंट ओपन करु शकता. यासोबतच पासबुक, चेकबुकसह एटीएम कार्डही घेऊ शकता. मात्र येथे तुम्हाला झिरो बॅलेन्सवर अकाउंट ओपन करता येणार आहे.

  • -MIN READ Local18 New Delhi,Delhi
  • Last Updated :

आशीष कुमार, पश्चिम चंपारण: बँक अकाउंट ओपन करु इच्छिणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. जर तुम्हाला सेम डेटमध्ये झिरो बॅलेन्सवर आपले बँक अकाउंट ओपन करायचं असेल आणि पासबुक, चेकबुक आणि एटीएम कार्डही त्यात दिवशी घ्यायचे असेल तर ही बातमी तुमच्यासाठीच आहे. अनेक लोकांना वाटतं की, सेम टेडमध्ये अकाउंट ओपन होईल. मात्र चेकबुक आणि एटीएम मिळणार नाही. काहीवेळा अशी परिस्थिती निर्माण होते की, तुम्हाला सेम डेटमध्येच अकाउंटसह पासबुक आणि चेकबुकची आवश्यकता असते. पण माहितीच्या अभावामुळे तुम्ही काहीही करु शकत नाही आणि चिंताग्रस्त होता. मात्र आता तुम्हाला घाबरण्याची गरज नाही कारण इथे तुमची समस्या सुटणार आहे.

महिलांना कॅशबॅकसह इतर सुविधा देतात ‘हे’ सेविंग अकाउंट, अवश्य घ्या जाणून

इथे आहे तुमच्या प्रॉब्लमचं सोल्यूशन

बेतिया येथील गौशाला रोड येथील बँक ऑफ इंडियाचे चीफ मॅनेजर ऋषिकेश विश्वकर्मा सांगतात की, सहसा खाते एका दिवसात उघडले जाते, परंतु पासबुक, चेकबुक आणि एटीएम कार्ड देण्यासाठी थोडा वेळ लागतो. पण बँकांच्या एका विशेष योजनेअंतर्गत ही समस्या सोडवली जाऊ शकते, ज्याला वेलकम किट या नावाने ओळखलं जातं.

Axis Bank च्या ग्राहकांसाठी खुशखबर! FD व्याजदरांमध्ये केली वाढ

वेलकम किटच्या अंतर्गत ग्राहक सर्व सरकारी बँकांमध्ये काही तासांमध्येच आपलं अकाउंट ओपन करु शकता. यासोबतच पासबुक, चेकबुकसह एटीएम कार्डही घेऊ शकता. महत्त्वाचं म्हणजे येथे तुमचं अकाउंट झिरो बॅलेन्सवरही ओपन होईल. मात्र चेकबुक तसेच एटीएम कार्डसाठी तुम्हाला 1000 रुपये चार्ज करावे लागेल. जर तुम्हाला पासबुकसह केवळ चेकबुक हवं असेल, एटीएम कार्ड नाही. तर अशा कंडीशनमध्ये तुम्हाला केवळ 500 रुपये चार्ज द्यावे लागतील.

News18लोकमत
News18लोकमत

हे डॉक्यूमेंट्स आहेत महत्त्वाचे

ऋषिकेश सांगतात की बँकांमध्ये कोणतेही खाते उघडण्यासाठी त्या व्यक्तीचे ओळखपत्र आणि काही महत्त्वाची कागदपत्रे जसे की निवासस्थान इत्यादी आवश्यक असतात. मात्र वेलकम किटमध्ये तुम्हाला तुमचे पॅन कार्ड आणि कोणताही एक ओळखीचा पुरावा (ज्यावर तुमचा फोटो आणि पत्ता नमूद केलेला आहे) द्यावा लागेल. महत्त्वाचं म्हणजे, वेलकम किटसाठी पॅन कार्ड सर्वात महत्वाचे आहे. मात्र जे लोक शिक्षित नाहीत, त्यांना वेलकम किटद्वारे सेम डेटला एटीएम कार्ड मिळू शकणार नाही. कारण इथं इंटरनेट बँकिंग महत्त्वाचंय.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात