मुंबई, 15 मार्च: ज्या वेळी एखाद्या खाजगी कंपनीतील कर्मचारी नोकरी बदलतो तेव्हा त्याच्या मालकाकडून नवीन EPF खाते उघडले जाते. मात्र, ते उघडताना जुना UAN क्रमांक वापरला जातो. जर तुम्ही पीएफ खातेधारक असाल आणि तुमची दोन किंवा अधिक अकाउंट असतील तर तुम्ही पीएफ खाते मर्ज करुन घ्यायला हवे. पीएफ अकाउंट मर्ज करण्याची प्रक्रिया सोपी आहे आणि ती तुम्ही घरी बसून आरामात ऑनलाइन पूर्ण करु शकता. पीएफ अकाउंट एकामध्ये मर्ज केल्यानंतर, मिळणारे व्याज हे जास्त असते.
ज्येष्ठ नागरिकांसाठी बेस्ट आहे 'ही' पेन्शन योजना, 15 दिवसात होणार बंद!
तुम्ही नवीन कंपनीत नोकरी जॉईन करत असाल आणि तुमचा जुना UAN नंबर दिला तर तुमचे जुने अकाउंट नवीन अकाउंटशी लिंक होऊ शकत नाही. याचा अर्थ जुन्या अकाउंटमध्ये जमा केलेला निधी नवीन अकाउंटमध्ये जमा होणार नाही. अशा परिस्थितीत जुना फंड नवीन अकाउंटमध्ये अॅड करण्यासाठी पीएफ अकाउंट मर्ज करणे आवश्यक आहे. यासाठी तुम्हाला ईपीएफओच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी लागेल. येथे तुम्हाला सर्व्हिसेसमध्ये जाऊन स्टेप बाय स्टेप काही माहिती द्यावी लागेल. चला जाणून घेऊया पीएफ खाते विलीन करण्याची संपूर्ण प्रक्रिया काय आहे…
-EPFO ची वेबसाइट https://www.epfindia.gov.in/site_en/ वर साइन इन करा.
-होम पेजवर जाणून My Account वर क्लिक करा.
-My Account वर अकाउंट डिटेल्स अंतर्गत मर्ज अकाउंटवर क्लिक करा.
-मर्ज अकाउंट पेजवर अशा अकाउंटचे डिटेल्स टाका जे तुम्हाला तुमच्या नवीन अकाउंटमध्ये मर्ज करायचे आहेत.
-संपूर्ण डिटेल्स भरल्यानंतर, तुम्हाला रजिस्टर्ड मोबाइल नंबरवर व्हेरिफिकेशन ओटीपी मिळेल.
-तुमच्या रजिस्टर्ड मोबाईल नंबरवर OTP येईल, तुम्ही OTP नंबर टाकताच तुमची जुनी PF खाती दिसू लागतील.
-तुमच्या EPFO खात्याशी एकापेक्षा जास्त बँक अकाउंट जोडलेली असल्यास, तुम्हाला तुमचे नवीन अॅक्टिव्ह बँक अकाउंट म्हणून कोणते अकाउंट वापरायचे आहे ते निवडा.
-ही माहिती भरल्यानंतर सेव्ह करा आणि नंतर बंद करा.
-तुमचे नवीन मर्ज केलेले EPFO खाते तयार केले जाईल आणि व्हेरिफिकेशननंतर सक्रिय केले जाईल.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Epfo news