विक्रम कुमार झा, पूर्णिया: तुम्हाला तुमच्या बचतीवर जबदरस्त व्याज हवा असेल तर पोस्ट ऑफिसच्या स्किममध्ये गुंतवणूक करणं फायदेशीर ठरु शकते. पोस्ट ऑफिसची एक स्किम आहे जी तुम्हाला मालामा करेल. बिहारच्या पूर्णिया येथील प्रधान डाकघरचे पोस्ट मास्टर अवधेश कुमार मेहता यांनी टाइम डिपॉझिटविषयी माहिती दिलीये. ज्येष्ठ नागरिकांसाठी बेस्ट आहे 'ही' पेन्शन योजना, 15 दिवसात होणार बंद!
टाइम डिपॉझिटमध्ये कमीत कमी एक वर्ष आणि जास्तीत जास्त पाच वर्षांपर्यंत पैसा जमा करुन तुम्ही मालामाल होऊ शकता. यावर तुम्हाला जबरदस्त व्याज मिळेल. कुमार मेहता यांनी सांगितले की, ग्राहकांना आधार कार्ड, पॅन कार्ड आणि फोटो आणि नगदी पैसे किंवा चेकबुक घेऊन आपल्या जवळच्या पोस्ट ऑफिसमध्ये जाऊन खातं उघडावं लागेल. यानंतर तुमच्या खात्या जमा रक्कम टाइम डिपॉझिटअंतर्गत जमा करुन तगडे व्याज कमावले जाऊ शकते. ना इंधन ना चार्जिंग, तरीही रस्त्यांवर सुसाट धावते ही 'वंडर कार'; 100 km चा खर्च ऐकून व्हाल चकीत
पोस्टमास्तर म्हणाले की, जर कोणत्याही व्यक्तीला टाइम डिपॉझिट खात्यात पैसे जमा करायचे असतील तर तो किमान एक वर्ष आणि जास्तीत जास्त पाच वर्षांपर्यंत पैसे जमा करू शकतो. जर तुम्ही एका वर्षासाठी पैसे जमा केले तर तुम्हाला 6.6 टक्के व्याज मिळेल. दोन वर्षांच्या ठेवीवर 6.8 टक्के तर तीन वर्षांच्या ठेवीवर 6.9 टक्के व्याज दिले जाईल. याशिवाय तुम्ही पाच वर्षांसाठी रक्कम जमा केल्यास त्यावर 7 टक्के व्याज मिळेल. नोकरी बदलल्याने अनेक EPF अकाउंट झालेय? लगेच करा मर्ज, अन्यथा...
टाइम डिपॉझिटमध्ये पैसे जमा करताना काही गोष्टींकडे विशेष लक्ष देणं गरजेचं असतं. टाइम डिपॉझिटअंतर्गत सहा महिनेयपर्यंत लॉक इन पीरिडय राहतो. म्हणजे पुढचे सहा महिनेयपर्यंत पैसे तुम्ही काढू शकत नाही. झिरो बॅलेन्सवर असं ओपन करा अकाउंट; पहिल्याच दिवशी मिळेल पासबुक, चेकबुकसह एटीएमकार्ड!
एखाद्या व्यक्तीला पैसे काढायचे असतील तर त्यांना मॅच्योरिटी टाइमपूर्वी पैसे काढल्यास सेविंग खात्यावर मिळणारे व्याजदरच मिळेल. मात्र जर कुणी त्यांच्या ठरलेल्या मॅच्योरिटी टाइमवर पैसे काढले तर त्यांना टाइम डिपॉझिटअंतर्गत निर्धारित व्याजाचा लाभ मिळेल. 50 हजार रुपयांत सुरु होईल बिझनेस, मार्केटमध्ये आहे जबरदस्त डिमांड!