कुंदन कुमार, गया : आपला स्वतःचा व्यवसाय सुरु करावा अशी प्रत्येकाची इच्छा असते. मात्र तो व्यवसाय अत्यंत हुशारीने सुरु करावा लागतो. बाजारात काय मागणी आहे हे लक्षात घेऊन तुम्ही व्यवसाय सुरु केला तर तुम्ही नक्कीच यशस्वी होता. सरकारने सिंगल यूज प्लास्टिकवर बंदी घातली आहे तेव्हापासून बांबूच्या उद्योगामध्ये तेजी आली आहे. याच संधीचा फायदा उचलत सविता यांनी बांबूचा व्यवसाय सुरु केलाय. सविता यांनी सांगितले की, बांबूची बॉटल, बांबूपासून बनवलेल्या कप-प्लेट, ट्रे, फ्लॉवर पॉट, पुष्पगुच्छ, चमचे, प्लेट, स्ट्रॉ, सोफा, खुर्च्या, बांबूसारख्या सजावटीच्या वस्तूंची मागणी सातत्याने वाढत आहे. सध्याच्या काळातील अनहेल्दी लाइफ स्टाइलच्या दरम्यान आता नैसर्गिक उत्पादनांची मागणी झपाट्याने वाढतेय. याच कारणामुळे बांबूपासून बनवलेले प्रोडक्ट्स अनेक लोकांना आकर्षित करत आहेत.
‘या’ तंत्रज्ञानाने पालटले शेतकऱ्याचे नशीब! सहज मिळतोय 6 ते 7 लाखांचा नफा, नेमकं कोणतं तंत्रज्ञान?2007 मध्ये RSETI मधून बांबू आर्ट अँड क्राफ्टचे प्रशिक्षण घेतले
गयामध्ये एक महिला आहे जी बांबूचे पदार्थ बनवून हजारो कमावतेय. गया येथील इमामगंज ब्लॉक भागातील पकरी गुरिया गावातील रहिवासी असलेल्या सविता गुप्ता यांनी ही कमाल केली आहे. सविताने 2007 मध्ये RSETI मधून बांबू आर्ट अँड क्राफ्टचे प्रशिक्षण घेतले. यानंतर त्यांनी हा व्यवसाय वाढवला आणि आज सविता मागणीनुसार महिन्याला लाख रुपयांपर्यंत कमावते. ती बांबूपासून बोट, पुष्पगुच्छ, ट्रे, फ्लॉवर पॉट, सजावटीचे साहित्य, पेन स्टँड, फळांची टोपली असे 30 प्रोडक्ट्स तयार करते. बिहारसह इतर राज्यात स्टॉल लावून त्याची विक्री करते. त्यांच्याकडे बांबूची उत्पादने 50 ते 1000 रुपयांपर्यंत उपलब्ध आहेत.
आसाममधून मागवतात बांबू
बांबूचे प्रोडक्ट्स बनवण्यासाठी सविता आसाममधून मकला बांबू आणतात. ज्याची किंमत सुमारे 300 रुपये प्रति बांबू अशी असते. यासोतबच त्या स्थानिक बांबूपासून अनेक उत्पादने बनवतात. न्यूज18 लोकलशी बोलताना सविताने सांगितले की, तिने 2007 मध्ये RSETI मधून चार महिने प्रशिक्षण घेतले होते. त्यानंतर ती जीविकामध्ये रुजू झाली आणि 2 हजार रुपयांचे कर्ज घेऊन हा व्यवसाय सुरू केला. आज चांगले उत्पन्न मिळत आहे. मागणीनुसार महिन्याला लाखापर्यंत कमाई होते. सविता या 30 प्रकारचे प्रोड्क्ट्स तयार करतात. अनेक ठिकाणी यात्रा किंवा प्रदर्शनांमध्ये त्या स्टॉल लावतात. तसंच मंत्री किंवा मुख्यमंत्र्यांच्या आगमनावरही ऑर्डर येतात. जानेवारीत मुख्यमंत्री नितीश कुमार यांचा गया येथे दौरा झाला होता. तेव्हा त्यांनी सविता यांच्या कामाचं कौतुक केलं होतं. सविता आज जीविकाच्या माध्यमातून अनेक महिलांना या उत्पादनांचे प्रशिक्षणही देत आहेत.
अबब! नवरीची साडी 17 कोटी तर दागिने 90 कोटींचे, ‘या’ शाही लग्नाचा खर्च पाहून तुम्हालाही येईल चक्कर