पंतप्रधान वय वंदना योजना (PMVVY) ही भारत सरकारने 2017 मध्ये सुरू केलेली पेन्शन योजना आहे. ही योजना 60 वर्षे किंवा त्याहून अधिक वयाच्या ज्येष्ठ नागरिकांना पेन्शन देते. ही योजना LIC द्वारे प्रशासित केली जाते. ही सरकार-समर्थित योजना आहे. हिचा उद्देश ज्येष्ठ नागरिकांना आर्थिक सुरक्षा प्रदान करणं आणि त्यांचा निवृत्तीनंतरच्या गरजा पूर्ण करण्यात मदत करणं हा आहे. सध्या ही योजना 31 मार्च 2023 पर्यंत उपलब्ध आहे.
केंद्र सरकारने अनुदान म्हणून दिलेल्या रकमेतून येणारा वार्षिक रिटर्न आणि एलआयसी कंपनीने तयार केलेला वार्षिक रिटर्न यातील फरकाला डिफ्रंशियल रिटर्न म्हणतात. योजनेचा कालावधी 10 वर्षांचा असून पेन्शनची रक्कम ग्राहकाच्या निवडीनुसार मासिक/त्रैमासिक/ सहामाही/वार्षिक या पद्धतीने दिली जाते.
2018 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील केंद्रीय मंत्रिमंडळाने या योजनेतील गुंतवणुकीची मर्यादा 7.5 लाख रुपयांवरून 15 लाख रुपयांपर्यंत वाढवण्यास मान्यता दिली होती. योजनेअंतर्गत 12,000 रुपये वार्षिक पेन्शनसाठी किमान गुंतवणूक 1,56,658 रुपये तर 1000 रुपये प्रति महिना पेन्शनची किमान रक्कम मिळवण्यासाठी गुंतवणुकीची रक्कम 1,62,162 रुपये अशी सुधारित करण्यात आली आहे.
PMVVY योजनेअंतर्गत, ज्येष्ठ नागरिक या योजनेत एकदाच रक्कम गुंतवू शकतात आणि 10 वर्षांसाठी पेन्शन मिळवू शकतात. योजनेंतर्गत पेन्शनच्या व्याजाचे दर निश्चित आहेत आणि निवडलेल्या पेन्शन पेमेंटच्या पद्धतीनुसार 7.40% ते 7.66% प्रतिवर्षी, मासिक-त्रैमासिक (7.45%) व सहामाही (7.52%) व्याजदराने पेन्शन दिली जाते.
-कोणतीही वैद्यकीय तपासणी आवश्यक नाही.
-स्वत:चा किंवा जोडीदाराचा गंभीर आजार अथवा अपवादात्मक परिस्थितीत पॉलिसीच्या मुदतीपूर्वीच एक्झिट करता येते. अशा प्रकरणांमध्ये संपूर्ण रकमेपैकी 98% रक्कम परत केली जाते.
-पॉलिसीची तीन वर्षे पूर्ण झाल्यानंतर पॉलिसी अंतर्गत कर्ज घेता येते. तुम्ही रकमेच्या 75 टक्क्यांपर्यंत कर्ज घेऊ शकता.
पेन्शनविषयी सरकारचा मोठा निर्णय! कर्मचाऱ्यांना मिळणार दिलासा
-ही योजना 60 वर्षे आणि त्यापेक्षा जास्त वयाच्या नागरिकांसाठी तत्काळ पेन्शन प्रदान करते. एकदाच रक्कम भरून ती खरेदी करता येते.
-पेन्शनसाठी कालावधीचे पर्याय
-या योजनेअंतर्गत तुम्ही मासिक, त्रैमासिक, सहामाही आणि वार्षिक असे पेन्शनचे पर्याय निवडू शकता. त्यानुसार तुम्हाला पेन्शन मिळते.
-10 वर्षांच्या कालावधीत पेन्शनधारकाचा मृत्यू झाल्यास कायदेशीर वारसांना किंवा नॉमिनीला खरेदीची रक्कम परत केली जाते.
-10 वर्षांच्या पॉलिसी टर्मच्या समाप्तीपर्यंत पेन्शनधारक जिवंत असल्यास खरेदी केलेल्या रकमेसह शेवटच्या हप्त्यापर्यंत पेन्शन दिली जाईल.
-फक्त भारतीय नागरिक या योजनेस पात्र आहेत.
a) किमान वय : 60 वर्षे (पूर्ण)
b) जास्तीत जास्त वयाला मर्यादा नाही
c) पॉलिसी टर्म : 10 वर्षे
d) किमान पेन्शन : मासिक 1,000 रुपये
त्रैमासिक 3,000 रुपये
सहामाही 6,000 रुपये
वार्षिक 12,000 रुपये
e) कमाल पेन्शन : मासिक 9,250 रुपये
त्रैमासिक 27,750 रुपये
सहामाही 55,500 रुपये
वार्षिक 1,11,000 रुपये
या योजनेतील सर्व पॉलिसींच्या अंतर्गत खरेदी किमतीची एकूण रक्कम एका ज्येष्ठ नागरिकासाठी 15 लाखांपेक्षा जास्त नसावी.
आर्थिक वर्ष 2022-23 साठी ही योजना दरमहा देय वार्षिक 7.40% व्याजदराने पेन्शन प्रदान करते.
पॉलिसी ऑफलाइन किंवा एलआयसीच्या अधिकृत वेबसाइटद्वारे घेता येते.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.