घरी बसलेले असो वा प्रवासात, ऑफिसमध्ये असो की बाहेरच्या कामावर असो, लहान मुले असोत की प्रौढ, सर्वांनाच चिप्स खूप आवडतात. बटाट्याच्या चिप्सची मागणी आता एव्हरग्रीन झाली आहे. बाजारात चिप्सची मागणी इतकी आहे की ती पुरवणे कठीण होते. 5 रुपयांपासून सुरू होणारी पाकिटे 50 रुपये ते 100 रुपयांपर्यंत उपलब्ध आहेत. यामध्ये कमी गुंतवणुकीत तुम्ही चांगली कमाई करू शकता.
या व्यवसायात सुरुवातीची गुंतवणूकही फारशी नाही. 30 ते 35 हजार रुपयांमध्ये तुम्हाला चिप्स बनवण्याचे छोटे मशीन मिळेल. याशिवाय, तुम्हाला पॅकिंग मशीन देखील घ्यावे लागेल. मशीनशिवाय तुम्ही 50,000 रुपये किंवा त्यापेक्षा कमी किमतीत काम सुरू करू शकता. पण दोन्ही मशीन घेतल्याने तुमची किंमत वाढेल. सुरुवातीला मशीनशिवाय काम सुरू करून तुम्ही ट्रायल देखील करू शकता. इंजिनिअरची नोकरी सोडून पठ्ठ्याने सुरु केले मशरूम उत्पादन! आता करतो लाखोंची कमाई
हे काम तुम्ही घरातील छोट्या जागेतून किंवा खोलीतून सुरू करू शकता. कच्चा माल म्हणून तुम्हाला चांगल्या प्रतीचे बटाटे, मीठ, चाट मसाला, मिरची पावडर, तेल आणि बेकिंग सोडा इत्यादींची आवश्यकता असेल. तुम्ही तुमच्या मदतीसाठी कुटुंबातील सदस्यांची मदत घेऊ शकता किंवा तुम्ही कर्मचारी देखील हायर करु शकता. वयाच्या 15 वर्षी सोडलं घर, घरोघरो जाऊन विकले चाकू; आज कमावते कोट्यवधी रुपये!
हे काम सुरू करण्यासाठी, तुम्हाला तुमचे उत्पादन बाजारात आणण्यापूर्वी रजिस्ट्रेशन करावी लागेल. प्रथम तुम्ही एमएसएमई अंतर्गत रजिस्ट्रेशन करा. यानंतर ट्रेड लायसेंस घ्यावा लागेल. याशिवाय, तुम्हाला फर्म किंवा कंपनीच्या नावावर बँक खाते, पॅन कार्ड, जीएसटी क्रमांक देखील घ्यावा लागेल. अन्न विभागाने उत्पादनाची चाचणी केल्यानंतर, तुम्हाला FSSAI चा परवाना मिळू शकतो. महिलेने संकटात शोधली संधी! कोरोनात नोकरी गेल्याने सुरु केला कुरकुऱ्याचा उद्योग, आता...