भारतीय आयुर्विमा महामंडळाच्या योजना ग्राहकांना विविध प्रकारचे फायदे देतात. फायदेशीर आणि गँरंटीड रिटर्न ही या योजनांची खासियत आहे. तुम्हालाही असे फायदे घ्यायचे असतील, तर ही माहिती तुमच्यासाठी फायदेशीर ठरु शकते. ज्यामध्ये ग्राहकांना कमी गुंतवणुकीत आपले पैसे वाढवण्याची संधी मिळते. अचानक पैसे लागल्यास कसे उभे करायचे, तुमच्या पॉलिसीवर मिळणार का लोन? काय नियम
LIC Jeevan Azaad पॉलिसीचे फायदे : देशातील सर्वात मोठी विमा कंपनी लाइफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाची जीवन आझाद पॉलिसी ही एक नॉन पार्टिसिपेटिंग विमा योजना आहे. LIC ने जानेवारी 2023 मध्ये ते लाँच केले. या योजनेला ग्राहकांचा मोठा प्रतिसाद मिळाला आहे. लाँच झाल्यानंतर काही दिवसांतच 50,000 ग्राहक जीवन आझाद पॉलिसीमध्ये सामील झाले. आता मुलांच्या भविष्याची चिंता सोडा! LIC च्या 'या' पॉलिसीमध्ये गुंतवणूक करुन मिळेल मोठा फायदा
या योजनेत, पॉलिसीधारकाचा अचानक मृत्यू झाल्यास, कुटुंबातील सदस्यांना आर्थिक मदत मिळते. जर पॉलिसीधारक मॅच्युरिटीपर्यंत जिवंत राहिला तर त्याला/तिला गॅरंटीड सम एश्योर्ड अमाउंचसह संपूर्ण पैसे परत मिळतात. पॉलिसीधारक वार्षिक, सहामाही, त्रैमासिक आणि मासिक प्रीमियम्सची निवड करू शकतात. LIC किंवा पोस्ट ऑफिसची पॉलिसी घेण्याचा विचार करताय? कोणती आहे बेस्ट?
या योजनेची वैशिष्ट्ये काय आहेत : जीवन आझाद योजना ही नॉन-लिंक्ड नॉन-पार्टिसिपेटिंग प्रीमियम एंडोमेंट योजना आहे. एलआयसी वेबसाइटवर उपलब्ध पॉलिसी डॉक्यूमेंट्सनुसार, एलआयसी जीवन आझाद अंतर्गत किमान मूळ विमा रक्कम 2 लाख रुपये ठेवण्यात आली आहे. तर कमाल मूळ विमा रक्कम 5 लाख रुपये निश्चित करण्यात आली आहे. महिलांनी रियल एस्टेटमध्ये गुंतवणूक करणं खरचं फायद्याचं? काय सांगतात नियम?
प्रीमियम भरण्याची मुदत मायनस 8 वर्षे आहे. याचा अर्थ असा की, तुम्ही ही पॉलिसी 18 वर्षांसाठी विकत घेतल्यास, प्रीमियम फक्त 10 वर्षांसाठी (18-8)) भरावा लागेल. पॉलिसीमध्ये किमान विमा रक्कम 2 लाख रुपये आणि कमाल विमा रक्कम 5 लाख रुपये आहे. जीवन आझाद पॉलिसी 3 महिन्यांच्या बालकापासून 50 वर्षांपर्यंतच्या व्यक्तीसाठी खरेदी केली जाऊ शकते. एलआयसी जीवन आझाद योजनेतील गुंतवणूक कालावधी किमान 15 आणि कमाल 20 वर्षे आहे.