भारतातील कोट्यावधी लोक अजूनही भारतीय आयुर्विमा महामंडळात म्हणजेच LIC मध्ये पैसे गुंतवण्यास प्राधान्य देतात. कारण त्यात कोणताही धोका नसतो. एलआयसी पॉलिसी गुंतवणूकदारांना दीर्घकालीन चांगल्या परताव्याचा लाभ देखील देते. पण तुम्हाला माहिती आहे का की चांगल्या रिटर्न्ससोबतच तुम्हाला एलआयसी पॉलिसीवर कर्जाची सुविधाही मिळते. आपत्कालीन परिस्थितीत, बँकेकडून वैयक्तिक कर्ज घेण्याऐवजी, तुम्ही एलआयसी विमा पॉलिसीवर कर्ज घेऊ शकता. याद्वारे तुम्ही तुमचा अभ्यास, लग्न घर, परदेशात जाणे, वैद्यकीय आणीबाणी इत्यादी खर्च भागवू शकता. जाणून घेऊया एलआयसीवर कर्ज घेण्याची प्रोसेस काय?
एलआयसी पॉलिसीवर कर्ज कसे घेता येईल? : एलआयसी पॉलिसीवर लोन घेण्यासाठी तुम्ही ऑनलाइन आणि ऑफलाइन दोन्ही पद्धतींनी अप्लाय करु शकता. तुम्हाला ऑफलाइन पद्धतीने कर्ज हवे असल्यास एलआयसी पॉलिसीशी संबंधित सर्व कागदपत्रे घ्या आणि एलआयसी कार्यालयात जा. तेथे तुमच्या केवायसीसाठी सर्व कागदपत्रे सादर करावी लागतील. यानंतर तुम्हाला एक फॉर्म भरावा लागेल. यानंतर तुम्हाला पॉलिसीवर एलआयसीकडून कर्ज मिळेल. UPI वरुन किती पैसे पाठवता येतात? SBI, HDFC सह प्रमुख बँकांची लिमिट काय?
ऑनलाइन अर्ज कसा करावा? : हे कर्ज ऑनलाइन मिळविण्यासाठी, तुम्हाला एलआयसी ई-सेवेमध्ये नोंदणी करावी लागेल. यानंतर तुम्ही अकाउंटवर लॉगिन करू शकाल. यानंतर, तुम्ही येथून तपासू शकता की तुम्हाला पॉलिसीवर कर्ज मिळू शकते की नाही. यानंतर, कर्जाचे व्याजदर आणि अटी वाचा. यानंतर ऑनलाइन अर्ज भरा आणि KYC कागदपत्रे सबमिट करा. यानंतर तुमच्या लोनसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया पूर्ण होईल. आता मुलांच्या भविष्याची चिंता सोडा! LIC च्या 'या' पॉलिसीमध्ये गुंतवणूक करुन मिळेल मोठा फायदा
एलआयसी पॉलिसीवर लोन घेण्याचे नियम काय?: कर्जाची सुविधा फक्त LIC च्या एंडॉवमेंट आणि ट्रेडिशनल पॉलिसींवर उपलब्ध आहे. एलआयसीच्या नियमांनुसार, एलआयसी पॉलिसीच्या सरेंडर व्हॅल्यूच्या फक्त 90% पर्यंत कर्ज उपलब्ध आहे. स्वतःचं घर खरेदी करण्याचा प्लान करताय? ही ट्रिक फॉलो करुन दुप्पट करता येईल टॅक्स सेविंग
एलआयसीचा कर्जाचा व्याजदर साधारणपणे 10 ते 12 टक्के असतो. जर पॉलिसीधारकाने एलआयसी पॉलिसीवर घेतलेल्या लोनची परतफेड केली नाही, तर एलआयसी त्याच्या मनी पॉलिसी मॅच्योर झाल्यावर कर्जाची रक्कम परत घेऊ शकते. यासोबतच जर एखाद्या व्यक्तीच्या पॉलिसीचे सरेंडर व्हॅल्यू कर्जाच्या रकमेपेक्षा जास्त असेल तर तुम्ही कर्ज घेतल्यानंतरही पॉलिसी बंद करू शकता.