प्रत्येकजण खूप मेहनत आणि स्वप्ने घेऊन आपलं घर बांधत असतो. घर बांधण्यासाठी आपली आयुष्यभराची पुंडी आणि भांडवल त्यात गुंतवणलं जातं. अशा परिस्थितीत त्याच्या सुरक्षेची चिंता करणं गरजेचं असतं. यासाठी तुम्ही तुमच्या घराचा विमा काढला पाहिजे. यामुळे नैसर्गिक आपत्ती आणि इतर गोष्टींमुळे झालेल्या नुकसानीची आर्थिक भरपाई होण्यास मदत होते.
आम्ही तुम्हाला सांगतो की, होम इंश्युरन्समध्ये, भूकंप, पूर यासह चोरी आणि इतर किरकोळ गोष्टींसारख्या नैसर्गिक आपत्तींमुळे झालेल्या नुकसानीची वसुली देखील इन्शुरन्सद्वारे केली जाऊ शकते. आज आम्ही तुम्हाला घराचा विमा घेणे का आवश्यक आहे आणि त्याचे फायदे काय आहेत हे सांगणार आहोत. Alert ! मार्च संपण्यापूर्वी करा ही कामं, अन्यथा तुमच्या खिशावर होईल परिणाम
होम इन्शुरन्स का महत्त्वाचे? : ज्या प्रकारे आपण आपल्या वाहनाचा किंवा स्वतःचा विमा काढतो, त्याच प्रकारे घराचाही विमा उतरवला जातो. यामुळे तुम्हाला घराचे नुकसान भरून काढण्यास मदत मिळते. एक चांगला होम इन्शुरन्स नैसर्गिक आपत्तींपासून ते इतर प्रकारच्या नुकसानीला कव्हर करू शकतो. तुम्हाला विमा कंपनीकडून या प्रकारच्या इन्शुरन्सवर आर्थिक सहाय्य दिले जाते. या प्रकारचा इन्शुरन्स कोणीही घेऊ शकतो. या सुविधेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला नियमित प्रीमियम भरावा लागेल. AC प्रमाणे भिंतीवर अडकवता येते 'हे' कूलर, थंडगार होईल पूर्ण रुम; किती आहे किंमत?
ज्यावेळी तुम्ही तुमच्या घराचा इन्शुरन्स काढता, तेव्हा ते तुमचे घर तसेच गॅरेज, हॉल, परिसर इ. कव्हर करते. यामध्ये तुम्हाला फर्निचर आणि इतर उत्पादने देखील अॅड ऑन सुविधेअंतर्गत मिळू शकतात. होम इन्शुरन्स तुम्हाला नैसर्गिक आपत्तींमुळे होणाऱ्या नुकसानीपासून तुमचे घर सुरक्षित करण्याचा ऑप्शन देते. याशिवाय तुमच्या घरात चोरी झाली असेल तर त्याचे नुकसानही कव्हर केले जाते. त्याच वेळी, काही विमा पॉलिसींमध्ये घरातून चोरीला गेलेल्या वस्तूंचे कव्हर देखील केले जाते. ऑनलाइन DTH रिचार्ज भरताना महिलेला 81 हजारांचा चुना! तुम्हीही करता का ही चूक?
होम इन्शुरन्स तुमच्या घराला आगीपासून संरक्षण देतो, नैसर्गिक आपत्तींमुळे होणारे नुकसान भरून काढण्यासाठी इन्शुरन्स, भाडेकरूसाठी इन्शुरन्स, घरमालकासाठी इन्शुरन्स, तुमच्या घरातील साहित्याचे संरक्षण करण्यासाठी इन्शुरन्स आणि घर दुरुस्ती किंवा पुनर्बांधणीसाठी इन्शुरन्स कव्हर प्रदान केले जाते. त्याचा सर्वात मोठा फायदा असा आहे की, विमा तुमच्या घराला होणाऱ्या कोणत्याही नुकसानीची भरपाई करण्यात मदत करतो. 5 वर्षात मालामाल व्हायचंय? पोस्ट ऑफिसची 'ही' स्किम आहे बेस्ट