मराठी बातम्या /बातम्या /मनी /Alert ! मार्च संपण्यापूर्वी करा ही कामं, अन्यथा तुमच्या खिशावर होईल परिणाम

Alert ! मार्च संपण्यापूर्वी करा ही कामं, अन्यथा तुमच्या खिशावर होईल परिणाम

31 मार्चपूर्वी ही कामं करणं अनिवार्य

31 मार्चपूर्वी ही कामं करणं अनिवार्य

यंदाचं आर्थिक वर्ष संपायला अगदी काही दिवस शिल्लक आहेत. अशा वेळी महत्त्वाची आर्थिक कामं लवकरात लवकर करणं गरजेचं असतं.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

मुंबई, 17 मार्च: आर्थिक दृष्टिकोनातून मार्च महिना खूप महत्त्वाचा मानला जातो. 31 मार्च ही अनेक महत्त्वाच्या कामांची अंतिम मुदत आहे, ती पूर्ण न केल्यास त्याचा थेट परिणाम तुमच्या खिशावर होऊ शकतो. आज आम्ही तुम्हाला अशाच पाच महत्त्वाच्या कामांची आठवण करुन देणार आहोत. जी 31 मार्चपूर्वी पूर्ण करणं खूप महत्त्वाचे आहे. तसे न केल्यास त्याचा थेट परिणाम तुमच्या खिशावर होईल.

आधार पॅन लिंक

तुम्ही अजून पॅन आणि आधार कार्ड लिंक केले नसेल तर हे काम लवकरात लवकर पूर्ण करा. जर तुम्ही 31 मार्चपूर्वी पॅन आधार लिंक केले तर तुम्हाला 1,000 रुपये दंड भरावा लागेल. तुम्ही असे न केल्यास, तुमचा पॅन निष्क्रिय केला जाईल. यासोबतच पॅन पुन्हा सक्रिय करण्यासाठी तुम्हाला 10,000 रुपये दंड भरावा लागेल.

टॅक्स सेव्हिंग इन्व्हेस्टमेंट

आर्थिक वर्ष 2022-23 लवकरच संपणार आहे. अशा वेळी, जर तुम्ही अजुनही कर बचत योजनेत गुंतवणूक केली नसेल, तर ती लवकरात लवकर करा. जर तुम्ही पीपीएफ, सुकन्या समृद्धी योजना, मुदत ठेव इत्यादी योजनांमध्ये गुंतवणूक करून या आर्थिक वर्षात कर बचतीचा लाभ घेऊ शकता. तुम्ही अशा योजनांमध्ये गुंतवणूक केली नाही तर तुम्हाला आयकरात कोणतीही सूट मिळणार नाही. तसंच जर तुम्ही 31 मार्चनंतर ही योजना घेतली तर तुम्हाला पुढच्या वर्षी इन्कम टॅक्समध्ये सूट मिळेल. यामुळे 31 मार्चपूर्वी हे काम करुन घ्या.

AC प्रमाणे भिंतीवर अडकवता येते 'हे' कूलर, थंडगार होईल पूर्ण रुम; किती आहे किंमत?

पीएम वयवंदना योजना

पीएम वय वंदना योजनेमध्ये तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर ते 31 मार्च 2023 पर्यंतच करून घ्यायला हवी. ही योजना पुढे नेण्यासाठी सरकारने कोणत्याही प्रकारची अधिसूचना जारी केलेली नाही. यामुळे यानंतर ही योजना बंद होऊ शकते. म्हणूनच तत्काळ या योजनेचा लाभ घ्या.

ऑनलाइन DTH रिचार्ज भरताना महिलेला 81 हजारांचा चुना! तुम्हीही करता का ही चूक?

म्युच्युअल फंड

सेबीच्या परिपत्रकानुसार, म्युच्युअल फंडात गुंतवणूक करणाऱ्यांना 31 मार्चपर्यंत नॉमिनेशन प्रक्रिया पूर्ण करावी लागेल. असे करण्यात अयशस्वी झाल्यास तुमचे खाते फ्रीज केले जाईल.

पीपीएफ अकाउंट

जर तुम्ही या आर्थिक वर्षात अद्याप PPF मध्ये 500 रुपये ट्रन्सफर केले नसेल, तर ते लवकरात लवकर करा. तसे न केल्यास 1 एप्रिलपासून तुमचे खाते निष्क्रिय केले जाईल. पीपीएफ अकाउंटमध्ये एका आर्थिक वर्षात किमान 500 रुपये ट्रान्सफर करणं अनिवार्य असतं.

First published:

Tags: Aadhar Card, Investment, Pan card online, Savings and investments