आपलं स्वतःचं घर असावं असं प्रत्येकाचं स्वप्न असतं. मात्र एकाच वेळी एवढी मोठी रक्कम जमा करणं शक्य नसतं आणि आपली तेवढी सेविंगही नसते. मग हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी होम लोन घ्यावं लागतं. अशा वेळी बँकांमध्ये तुम्हाला अनेकवेळा फेऱ्या माराव्या लागतात. तर कधी स्वस्त व्याजदराच्या शोधात तुम्ही इतर बँकांमध्येही जाऊन येता. यामध्ये तुमचा पैसा आणि वेळ दोन्ही वाया जातात. मात्र आता ही समस्या घरबसल्या देखील सोडवता येऊ शकते. कारण अनेक बँकांनी डिजिटल होम लोन कॉन्सेप्ट सुरु केली आहे. ज्यामध्ये ग्राहकांचा आढावा घेऊन कर्ज मंजूर करण्यापर्यंतचं सर्व काम ऑनलाइन केलं जातं.
होम लोनचे पैसे सहसा कर्जदाराच्या खात्यात तेव्हाच येतात. ज्यामुळे बँकेकडून सर्व प्रकारचा आढावा घेऊन त्याला कर्ज मंजुरीचे पत्र दिले जाते. डिजिटल होम लोनला एवढा वेळ लागत नाही. Easyloan सारखी अॅप्स तुम्हाला 15 पेक्षा जास्त बँकांशी टायअप करुन तुम्हाला 5 मिनिटांत कर्ज मिळवून देऊ शकतात. Easyloanचे फाउंडर प्रमोद कथूरिया म्हणतात की, लोनमध्ये अनेक प्रकरणात विनाकारण उशीर होतो आणि यामुळे अर्जदारांना निराशेचा सामना करावा लागतो.महिलांना कॅशबॅकसह इतर सुविधा देतात 'हे' सेविंग अकाउंट, अवश्य घ्या जाणून
त्वरीत लोन कसं मिळतं : EasyLoan ग्राहकांचे डिजिटल ऑन-बोर्डिंग, ग्राहक प्रोफाइल आधारित मॅच मेकिंग टूल, डॉक्यूमेंट्सचे डिजिटल संग्रहण आणि IP अल्गोरिदमद्वारे झटपट क्रेडिट विश्लेषण सारखी सुविधा देते. म्हणजेच अप्लाय केल्यानंतर 5 मिनिटांच्या आतच विशिष्ट व्यक्तीला किती कर्ज मिळू शकतं हे क्लियर होतं. यानंतर कस्टमरची फाइल फायनल अप्रूव्हलसाठी बँकेजवळ पाठवली जाते. 'या' क्रेडिटकार्डवर करा मनसोक्त शॉपिंग! मिळतील धमाकेदार ऑफर्स; महिलांसाठी बेस्ट
बँक, ग्राहक आणि डेव्हलपर एकाच मंचावर : EasyLoan आयपी टेक प्लॅटफॉर्मचे सुरक्षित आणि विश्वासार्ह प्लॅटफॉर्म प्रदान करते. जिथे ग्राहक, डेव्हलपर्स आणि बँका सर्वांना एकाच वेळी संवाद साधण्याची संधी मिळते. यामुळे तुम्हाला रिअल इस्टेट प्रकल्पात पैसे गुंतवण्यासाठी बँकेकडून कर्ज मिळवणं सोपं होतं आणि प्रोजेक्टविषयीही सुरक्षिततेची हमीही मिळते. यामध्ये आधार-बेस्ड ई-केवायसी वापरून गृहकर्ज अर्जांचे डिजिटल ऑनबोर्डिंग आणि उपलब्ध माहितीमधून ऑटो-फॉर्म फिलिंकचा ऑप्शनही मिळतो. Motor Insurance पॉलिसी क्लेम वारंवार रिजेक्ट होतंय? फॉलो करा या स्टेप्स
कर्जाची किंमत लगेच कळते : AI बेस्ड मॅचमेकिंगमुळे ग्राहकांची वैयक्तिक, आर्थिक आणि संपत्तीची माहिती वापरून ग्राहकाची क्रेडिट लिमिट ठरवली जाते. एवढेच नाही तर हे अॅप तुम्हाला एसबीआय, पीएनबी, एचडीएफसीसह 15 हून अधिक बँकांचे पर्याय देते. यावरून तुम्हाला कळू शकते की कोणती बँक किती कर्ज देत आहे आणि त्यावर किती व्याजदर आकारला जाईल. बेस्ट फॅमिली फ्लोटर हेल्थ इन्शुरन्स पॉलिसी कशी निवडावी? एका क्लिकवर घ्या जाणून