जाहिरात
मराठी बातम्या / मनी / बेस्ट फॅमिली फ्लोटर हेल्थ इन्शुरन्स पॉलिसी कशी निवडावी? एका क्लिकवर घ्या जाणून

बेस्ट फॅमिली फ्लोटर हेल्थ इन्शुरन्स पॉलिसी कशी निवडावी? एका क्लिकवर घ्या जाणून

हेल्थ इंश्युरन्स पॉलिसी

हेल्थ इंश्युरन्स पॉलिसी

विम्याची रक्कम निवडताना हे लक्षात ठेवलं पाहिजे की, ती कुटुंबातील सर्व सदस्यांमध्ये शेअर केली जाईल. म्हणून, कुटुंबातील सर्व सदस्यांसाठी पुरेशी असणारी विमा रक्कम निवडली पाहिजे.

  • -MIN READ Local18 Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

    मुंबई, 6 मार्च: सध्याच्या काळात आपल्या शरीर प्रकृतीमध्ये कधी बिघाड होईल हे अजिबात सांगता येत नाही. अशा परिस्थितीत आपल्याकडे एखादी हेल्थ किंवा लाईफ इन्शुरन्स पॉलिसी असणं अत्यंत आवश्यक आहे. फॅमिली फ्लोटर हेल्थ इन्शुरन्स पॉलिसी विमाधारकाला, आपल्या कुटुंबातील सर्व सदस्यांना एकाच पॉलिसीमध्ये कव्हर करण्याचा अधिकार देते. फॅमिली फ्लोटर हेल्थ इन्शुरन्स पॉलिसी या वैयक्तिक हेल्थ इन्शुरन्स पॉलिसीच्या तत्त्वावर कार्य करतात पण, त्यांचं कव्हरेज कुटुंबातील सर्व सदस्यांपर्यंत वाढवता येतं. फॅमिली फ्लोटर हेल्थ इन्शुरन्स पॉलिसीचं कव्हरेज पॉलिसी स्पेसिफिक असतं. हे तुम्हाला तुमचा जोडीदार आणि तुमच्यावर अवलंबून असलेली व्यक्ती किंवा कायदेशीररित्या दत्तक घेतलेल्या मुलांना तुमच्यासोबत जोडण्याची परवानगी देते. काही पॉलिसींमध्ये तर तुम्हाला तुमचे आई-वडील आणि सासू-सासरे यांनाही कव्हरमध्ये जोडण्याची सुविधा मिळते. बाजारात सध्या विविध हेल्थ इन्शुरन्स उपलब्ध आहेत. अशा परिस्थितीमध्ये सर्वोत्तम फॅमिली फ्लोटर हेल्थ इन्शुरन्स पॉलिसी निवडण्यासाठी काही घटकांची माहिती असणं गरजेचं आहे. ‘इंडिया टुडे’नं याबाबत वृत्त प्रसिद्ध केलं आहे.

    तुमच्या गरजा ओळखा

    सर्वप्रथम तुमच्या गरजा जाणून घेणं महत्त्वाचं आहे. कारण, त्यानंतरच तुम्ही गरजा पूर्ण करणारी योग्य पॉलिसी शोधू शकता. फॅमिली फ्लोटर हेल्थ इन्शुरन्स पॉलिसी अंतर्गत तुम्ही कुटुंबातील किती सदस्यांचा समावेश करण्याचा विचार करत आहात, हेदेखील ठरवा. आई-वडील आणि सासू-सासरे यांच्यासाठी स्वतंत्र पॉलिसी खरेदी करणं जास्त योग्य ठरू शकतं. कारण वृद्ध लोकांच्या आरोग्याच्या गरजा वेगळ्या असू शकतात. तुम्हाला आधीपासून एखादा आजार असल्यास आणि तुमच्या कुटुंबातील सदस्यांना आरोग्याच्या इतर गुंतागुंती असतील तर पॉलिसी घेताना त्याकडे लक्ष देण्याचं टाळू नका.

    पॉलिसीमध्ये समाविष्ट असलेले घटक

    पॉलिसी घेण्यापूर्वी इन्क्ल्युजन तपासून बघितलं पाहिजे. त्यातून आपल्या गरजा पूर्ण होतात की नाही हे जाणून घेणं महत्त्वाचं आहे. तुम्ही निवडत असलेल्या पॉलिसीमध्ये सर्व अत्यावश्यक पॉलिसी फायद्यांचा समावेश असल्याची खात्री केली पाहिजे. उदाहरणार्थ, इन-पेशन्ट हॉस्पिटलायझेशन, प्री आणि पोस्ट हॉस्पिटलायझेशन, डे-केअर उपचार, रुग्णवाहिका शुल्क, रुग्णालयातील खोलीचं भाडं, आयसीयू शुल्क, वार्षिक आरोग्य तपासणी इत्यादी गोष्टी त्यामध्ये कव्हर झाल्या पाहिजेत. प्रत्येक पॉलिसीचं इन्क्ल्युजन वेगळं असतं. त्यामुळे तुमच्‍या आवश्‍यकतेला अनुकूल अशी पॉलिसी निवडा.

    विम्याची रक्कम

    विम्याची रक्कम निवडताना हे लक्षात ठेवलं पाहिजे की, ती कुटुंबातील सर्व सदस्यांमध्ये शेअर केली जाईल. म्हणून, कुटुंबातील सर्व सदस्यांसाठी पुरेशी असणारी विमा रक्कम निवडली पाहिजे. या शिवाय, हेदेखील लक्षात घेतलं पाहिजे की, निवडलेली विमा रक्कम एकाच वेळी एकापेक्षा जास्त सदस्य रुग्णालयात दाखल झाल्यास वैद्यकीय बिल भरण्यासाठी पुरेशी असली पाहिजे. जास्त विमा रक्कमेची निवड केल्यानं तुम्हाला जास्त प्रीमियम मिळू शकतो, अशा परिस्थितीत टॉप-अप हेल्थ इन्शुरन्स पॉलिसी घेण्याचा विचार करा. त्यामुळे, तुम्ही मूळ पॉलिसीची रक्कम परवडणाऱ्या प्रीमियममध्ये करून घेऊ शकता.

    क्रेडिट कार्डच्या माध्यमातून असं करा UPI पेमेंट, या स्टेप करा फॉलो

    अ‍ॅड-ऑन कव्हर्स

    अ‍ॅड-ऑन कव्हर हे आपण निवडलेल्या हेल्थ इन्शुरन्स पॉलिसीसह दिलेले पर्यायी फायदे असतात. कॅन्सरच्या निदानासाठी एकरकमी रक्कम, प्रतीक्षा कालावधीसाठी रायडर, वैयक्तिक अपघात कव्हर, दैनंदिन रुग्णालयासाठी रोख रक्कम इत्यादी गोष्टींचा विमा कंपनीनं ऑफर केलेल्या अ‍ॅड-ऑन कव्हर्समध्ये समावेश होतो आहेत. हे अ‍ॅड-ऑन कव्हर्स हे पॉलिसी स्पेसिफिक असतात. काही पॉलिसी ही कव्हर्स देतात तर काही त्यांच्याकडे दुर्लक्ष करू शकतात. त्यामुळे पॉलिसी घेण्यापूर्वी काही पॉलिसींची आपसात तुलना करा आणि तुमच्या गरजेनुसार अ‍ॅड-ऑन कव्हर देणार्‍या पॉलिसीची निवड करा. अ‍ॅड-ऑनची निवड करण्यापूर्वी तुमच्या कुटुंबाचा वैद्यकीय इतिहास आणि आरोग्याशी संबधित जोखीम विचारात घ्या.

    सोनं खरेदी करायचंय? मग गमावू नका ही संधी! इथे मिळतंय स्वस्त सोनं

    क्लेम सेटलमेंट रेशो

    इन्शुरन्स आणि इन्सुरन्स कंपनी निवडताना क्लेम सेटलमेंट रेशो हा एक महत्त्वाचा घटक लक्षात घेतला पाहिजे. कारण एकूणात करण्यात आलेल्या क्लेमपैकी कंपनीने किती क्लेम सेटल केले याची आकडेवारी या रेशोतून कळत असते. त्यामुळे हाय क्लेम सेटलमेंट रेशो असलेली विमा कंपनी निवडा. तसेच कंपनीनं ऑफर केलेल्या क्लेमच्या प्रक्रियेला समान महत्त्व द्या. दावा करण्याची प्रक्रिया जाणून घेणं अतिशय गरजेचं आहे. प्रक्रियेची माहिती असल्यास तुम्हाला गरज पडल्यास दावा दाखल करणं सोपं जाईल.

    News18लोकमत
    News18लोकमत

    वर नमूद केलेल्या घटकांव्यतिरिक्त, क्युमुलेटिव्ह किंवा नो-क्लेम बोनस, ऑटोमॅटिक रिस्टोरेशन, रिचार्ज बेनिफिट्स, वार्षिक आरोग्य तपासणी, ऑनलाइन प्रीमियम सवलत इत्यादी पॉलिसी फायदे मिळणार आहेत की नाही हे तपासा. हे फायदे गरजेच्यावेळी तुम्हाला उपयोगी पडतील. स्टार हेल्थ अँड अलाईड इन्शुरन्स को. लिमिटेड सारख्या काही कंपन्या संपूर्ण कुटुंबासाठी लवचिक हेल्थ इन्शुरन्स पॉलीसी ऑफर करतात, जेणेकरून कुटुंबातील प्रत्येक सदस्याची गरज पूर्ण केली जाईल.

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    Tags: insurance
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात