क्रेडिट कार्डचा वापर करणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढतेय. यामध्ये महिला देखील मागे नाहीत. सामान्यतः शॉपिंग, रेस्टॉरंटचं बिल, ट्रॅव्हल किंवा किराणा सामानासाठी महिला या क्रेडिट कार्डचा वापर करतात. अशा वेळी महिलांना असं क्रेडिट कार्ड निवडायला हवं ज्यामध्ये त्यांना शॉपिंगसह सेविंगचाही फायदा होईल. चला तर मग जाणून घेऊया अशाच क्रेडिट कार्ड्सविषयी, ज्यामध्ये शॉपिंगवर कॅशबॅक देखील मिळेल. यासोबतच त्याच्या अॅनुअल फिसविषयीही सविस्तर माहिती आपण जाणून घेणार आहोत.
स्टँडर्ड चार्टर्ड EaseMyTrip क्रेडिट कार्डसह हॉटेल आणि फ्लाइट बुकिंगवर मोठ्या प्रमाणात डिस्काउंट मिळते. हे डिस्काउंट 20 टक्क्यांपर्यंत असू शकते. यासोबतच तुम्ही तिकीट बुकिंगवर 10X पर्यंत रिवॉर्ड मिळवू शकता. या कार्डची वार्षिक फी फक्त 350 रुपये आहे. बेस्ट फॅमिली फ्लोटर हेल्थ इन्शुरन्स पॉलिसी कशी निवडावी? एका क्लिकवर घ्या जाणून
अॅक्सिस बँकेचे फ्लिपकार्ट अॅक्सिस बँक क्रेडिट कार्ड त्यांच्या ग्राहकांना रु. 1,100 चं वेलकम बेनिफिट देते. या कार्डद्वारे, तुम्हाला Flipkart, Myntra सारख्या शॉपिंग वेबसाइटवर 4% पर्यंत सूट मिळते. त्या कार्डची वार्षिक फी 500 रुपये आहे. PPF, FD, म्यूच्युअल फंडमधील पैसे कधी होतात डबल? समजून घ्या सोपं गणित
SBI कार्ड ऑनलाइन ट्रांझेक्शनवर 5% कॅशबॅक देते. हा कॅशबॅक ऑनलाइन आणि ऑफलाइन दोन्ही ट्रांझेक्शनवर मिळतो. या कार्डची वार्षिक फी 999 रुपये आहे.
American Express SmartEarn क्रेडिट कार्डवर ग्राहकांना Rs.500 कॅशबॅक मिळते. हा कॅशबॅक रु. 1,000 खर्च केल्यावर मिळतो. यासोबतच, तुम्हाला Paytm wallet, Swiggy, BookMyShow, PVR, Myntra इत्यादींवर रिवॉर्ड पॉइंट्सचा लाभ मिळतो. या कार्डची वार्षिक फी 495 रुपये आहे. नियमित बँक स्टेटमेंट चेक करण्याची सवय नाही? होऊ शकतं मोठं नुकसान
Axis My Zone क्रेडिट कार्डवरील ग्राहकांना Paytm Movies द्वारे दुसऱ्या चित्रपटाचे तिकीट बुक करण्यावर 100% सूट मिळते. याशिवाय, तुम्हाला AJIO सारख्या फॅशन वेबसाइटवर खरेदीवर मोठ्या प्रमाणात सूट मिळेल. या क्रेडिट कार्डची वार्षिक फी 500 रुपये आहे.अचानक पैसे लागल्यास कसे उभे करायचे, तुमच्या पॉलिसीवर मिळणार का लोन? काय नियम