क्लेम रिजेक्शनपासून बचाव करण्याचे उपाय : वाहन चोरीला गेले किंवा अपघात झाला, तर तुम्ही सर्वप्रथम विमा कंपनीला कळवावे. यासोबतच नजीकच्या पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवावी व त्याची प्रत विमा कंपनीला द्यावी. यानंतर विमा कंपनीकडून नुकसानीची माहिती घेतली जाईल. क्रेडिट कार्ड वापरत असालच ना? मग ही माहिती असायलाच हवी, अन्यथा होईल नुकसान
CNG किट बद्दल द्या माहिती : दुरुस्तीच्या खर्चाचा अंदाज कंपनी घेईल. यासोबतच कागदपत्रे आणि टर्म-कंडीशनची तपासणी केली जाईल. दुसरीकडे, जर तुम्ही कारमध्ये सीएनजी किट बसवले असेल, तर तुम्हाला पॉलिसी पॉलिसी रिन्यू करतानाही त्याची माहिती द्यावी लागेल. त्यानंतर विमा कंपनी या आधारावर प्रीमियमची रक्कम जोडेल. 'या' बँकेनं सुरु केलं खास क्रेडिट कार्ड! स्विगीवर 30% डिस्काउंट; मंथली बोनसही उपलब्ध
का रिजेक्ट होऊ शकतं कार मोटर क्लेम : जर विमा उतरवलेले वाहन वैयक्तिक म्हणून घोषित केले आणि व्यावसायिक कारणांसाठी वापरले तर, विमा कंपनी दावा नाकारेल. एरियाच्या बाहेर अपघात झाल्यास, तुमचा क्लेम रिजेक्ट केला जाऊ शकतो. अल्कोहोल किंवा ड्रग्सच्या प्रभावाखाली वाहन चालवण्यामुळे क्लेम रिजेक्ट होईल. क्लेम रिजेक्शन टाळण्यासाठी विमा पॉलिसीच्या अटी आणि नियम जाणून घ्या. नियमित बँक स्टेटमेंट चेक करण्याची सवय नाही? होऊ शकतं मोठं नुकसान