बॉलिवूडचा किंग खान शाहरुख खान सध्या पठाण सिनेमामुळे चर्चेत आहे. शाहरुखनंतर आता लेक आर्यन खान देखील चर्चेत आलाय.
आर्यन खान ड्रग्ज प्रकरणानंतर स्टेबल झाला. दरम्यान नव्या वर्षात आर्यन खान प्रेमात पडल्याच्या चर्चा रंगल्यात.
आर्यन खानचं नावं आधी अभिनेत्री अनन्या पांडेबरोबर जोडलं गेलं होतं. पण आर्यन अनन्याला पूर्णपणे इग्नोर केल्याचं पाहायला मिळालं.
आर्यन खान सध्या दुबईमध्ये आहे आणि दुबईत आर्यनला हॉट अभिनेत्री नोरा फतेहीबरोबर स्पॉट करण्यात आलं आहे.