मुंबई, 02 डिसेंबर : बॉलिवूडचा बादशाह अर्थात शाहरुख खान लवकरच 'पठाण' चित्रपटात दिसणार आहे. त्याच्या चित्रपटाशी संबंधित पोस्टरही नुकतेच दिवशी रिलीज करण्यात आले आहे. या पठाणच्या पोस्टरमधील शाहरुख खान, दीपिका पदुकोण आणि जॉन इब्राहिम यांचा दमदार अंदाज पाहायला मिळाला. या चित्रपटाची सगळीकडेच चर्चा असताना शाहरुख खानच्या 'डंकी' चित्रपटाचे शूटिंगदेखील पार पडले आहे. पुढील वर्षी त्याचे पठाण, डंकी आणि जवान हे चित्रपट प्रदर्शित होणार आहेत, ज्याची त्याचे चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. अलीकडेच किंग खानने सौदी अरेबियामध्ये त्याच्या 'डंकी' चित्रपटाचे शूटिंग पूर्ण केले आहे. अभिनेत्याने एक व्हिडिओ पोस्ट करून ही बातमी शेअर केली आहे. दरम्यान, शाहरुख खान सध्या दुसऱ्याच कारणासाठी चर्चेत आहे.
शाहरुख खानने नुकतीच मुस्लिम धर्मियांची मक्का येथील पवित्र मशीदीला भेट दिली आहे, अशी बातमी समोर आली आहे. येथील त्याचे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. व्हायरल फोटोंमध्ये अभिनेता अगदी साध्या शैलीत दिसला, ज्याचे अनेक फोटो त्याच्या चाहत्यांनी शेअर केले आहेत.
शाहरुखने मक्का येथे भेट देऊन उमराह(प्रार्थना) केलं असल्याचा दावा केला जात आहे. या व्हिडिओमध्ये शाहरुख पांढरी वस्त्रं परिधान करून आहे आणि हा परिसर मक्का मशिदीचा असल्याची सोशल मीडियावर चर्चा आहे.
हेही वाचा - Nora Fatehi : फिफाच्या स्टेजवर नोरा फतेहीकडून तिरंग्याचा अपमान; 'तो' व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांचा राग अनावर
असे म्हणतात की उमराह हा हजप्रमाणेच असतो पण हजची निश्चित वेळ असते, मात्र उमराह केव्हाही करता येतो. उमराह करण्यासाठी गेलेल्या शाहरुख खानचे अनेक फोटो व्हायरल होत आहेत ज्यात तो पांढऱ्या रंगाच्या वस्त्रात दिसत होता. यासोबतच त्याने मास्कही घातला होता आणि त्याला अनेक लोकांनी वेढलेले दिसत आहे. शाहरुखच्या अनेक फॅन पेजने त्याचे फोटो आणि व्हिडिओ शेअर केले आहेत.
View this post on Instagram
शाहरुख खानने याआधी त्याच्या एका ट्विटमध्ये खुलासा केला होता की तो लवकरच मक्का शरीफ येथे उमराह करण्यासाठी जाणार आहे. आपल्या ट्विटमध्ये त्याने म्हटले होते की, "लवकरच मक्का मदिना येथे जाईन. सर्वजण आनंदी राहोत अशी प्रार्थना करेन." आता शाहरुखने आपलं स्वप्न पूर्ण करत मक्केला भेट दिली आहे. शाहरुखचा हा धार्मिक अंदाज पाहून अनेक चाहते कमेंट करत आहेत. काही यूजर्सनी त्याला त्याच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण कराव्यात अशी शुभेच्छा दिल्या तर काही यूजर्सनी शाहरुखच्या साधेपणाचे कौतुक केले.
शाहरुख खान त्याच्या आगामी 'डंकी' या चित्रपटाच्या शूटिंगच्या निमित्ताने सौदी अरेबियात होता. चित्रपटाचे शूटिंग पूर्ण होताच, त्याने इंस्टाग्रामवर शूट लोकेशनचा एक व्हिडिओ पोस्ट केला होता. त्यासोबतच त्याने चित्रपटाचे शूटिंग यशस्वी पार पडले यासाठी सौदी अरेबियाच्या सांस्कृतिक मंत्रालयाचे आणि चित्रपटाच्या टीमचे आभार मानले आहेत. शाहरुख खान व्यतिरिक्त आमिर खान, गौहर खान, सना खान आणि अली फजल सारखे स्टार्स देखील उमराह करण्यासाठी मक्का शरीफला पोहोचले होते. त्या स्टार्सच्या फोटोंनीही लोकांचे लक्ष वेधून घेतले होते.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Bollywood actor, Bollywood News, Entertainment, Shahrukh khan