मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

Aryan Khan: शाहरुख खानचा लेक आर्यन अभिनय नव्हे 'या' क्षेत्रात करणार पदार्पण; समोर आली माहिती

Aryan Khan: शाहरुख खानचा लेक आर्यन अभिनय नव्हे 'या' क्षेत्रात करणार पदार्पण; समोर आली माहिती

आर्यन खान

आर्यन खान

बॉलिवूड किंग खान म्हणून ओळखला जाणारा अभिनेता शाहरुख खानचा मोठा चाहतावर्ग आहे हे आपणा सर्वांनाच माहिती आहे. परंतु आता शाहरुखसोबतच त्याच्या मुलांचादेखील मोठा चाहतावर्ग निर्माण झाला आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Maharashtra, India
  • Published by:  Aiman Desai

मुंबई,7 ऑक्टोबर-  बॉलिवूड किंग खान म्हणून ओळखला जाणारा अभिनेता शाहरुख खानचा मोठा चाहतावर्ग आहे हे आपणा सर्वांनाच माहिती आहे. परंतु आता शाहरुखसोबतच त्याच्या मुलांचादेखील मोठा चाहतावर्ग निर्माण झाला आहे. बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यापूर्वीच शाहरुख आणि गौरी खानची मुलं सुहाना आणि आर्यनची जबरदस्त फॅन फॉलोईंग आहे. ते दोघेही सोशल मीडियावर प्रचंड लोकप्रिय आहेत. आता शाहरुखच्या चाहत्यांना सुहाना आणि आर्यन कधी पडद्यावर दिसणार याची उत्सुकता लागली आहे. दरम्यान सुहाना 'द आर्चिज' मधून बॉलिवूडमध्ये एन्ट्री करत असल्याचं समोर आल्याने चाहत्यांचं लक्ष आता आर्यन खांकडे लागून आहे. परंतु मीडिया रिपोर्ट्सनुसार, आर्यन खान अभिनय नव्हे तर वेगळ्या क्षेत्रातून इंडस्ट्रीत पाऊल ठेवणार असल्याचं समोर आलं आहे.

नुकतंच समोर आलेल्या मीडिया रिपोर्ट्सनुसार, शाहरुख खानचा लेक आर्यन अभिनेता नव्हे तर लेखक म्हणून इंडस्ट्रीत पाऊल ठेवणार आहे. तसेच चित्रपट नव्हे तर वेबसीरिजच्या माध्यमातून आर्यन खान मनोरंजनक्षेत्रात पदार्पण करत आहे. 24 वर्षीय आर्यनने वेबसीरिजची कथा लिहिण्याचं काम नुकतंच पूर्ण केल्याचं रिपोर्ट्समध्ये सांगण्यात आलं आहे. टाईम्स ऑफ इंडियाच्या रिपोर्टनुसार, आर्यन खानच्या या वेबसीरिजसाठी कलाकारांचा शोध घेतला जात आहे. आर्यन ज्या वेबसीरिजवर काम करत आहे, त्या वेबसीरिजच्या लेखनाचं काम फक्त पूर्ण झालं आहे. कलाकारांच्या कास्टिंगसाठी आर्यन स्वत: कलाकारांच्या प्रोफाइलची तपासणी करत असल्याचं सांगण्यात येत आहे.

(हे वाचा:VIDEO: गरोदर आलियासाठी माधुरी दीक्षितने पाठवलं खास गिफ्ट; पाहून तुम्हीही व्हाल खुश )

या रिपोर्टमध्ये असंही सांगण्यात आलं आहे की. आर्यन कलाकारांबाबत फारच सजग आहे. त्याला वाटतं की, वेब सीरिजमध्ये अशा कलाकारांची निवड व्हावी जे खरोखर त्या भूमिकेला शोभून दिसतील. त्यामुळे सीरिजचं लेखन पूर्ण झाल्यानंतर आर्यन खान कलाकारांचा शोध घेत आहे. काही कलाकारांनी यासाठी ऑडिशनसुद्धा दिलं आहे. तर त्यातील काही कलाकारांच्या नावाचा विचार केला जात आहे. तर काही कलाकार शॉर्टलिस्ट करण्यात आली आहेत. जर सर्वकाही सुरळीत पार पडलं तर या वर्षाच्या शेवटी सीरिजच्या चित्रीकरणाला सुरुवात होणार असल्याचंही रिपोर्ट्समध्ये सांगण्यात आलं आहे.

काही दिवसांपूर्वी दिलेल्या एका मुलाखतीत आर्यनबाबत बोलताना शाहरुख खानने उघड केलं होतं की, आर्यनला अभिनयात फारशी रुची नाहीय. त्याला दिग्दर्शन आणि लेखन करण्याची प्रचंड आवड आहे. इतकंच नव्हे तर आर्यन खानने विदेशात राहून दिग्दर्शनाचं शिक्षण घेतलं आहे. तो गेल्या चार वर्षांपासून या क्षेत्रातील प्रत्येक बारकावे आत्मसात बनवण्याचा प्रयत्न करत आहे.

First published:

Tags: Aryan khan, Bollywood, Entertainment, Shahrukh khan