आपल्या डान्स आणि सौंदर्याच्या जोरावर अभिनेत्री नोरा फतेहीने बॉलिवूडमध्ये आपलं एक खास स्थान बनवलं आहे. आपल्या प्रत्येक डान्स मूव्ह्सने नोरा प्रेक्षकांना घायाळ करते.
नोरा अनेक चित्रपटांमध्ये आयटम सॉंग करताना दिसून येते. आपल्या डान्सने नोराने लोकांना अक्षरशः वेड लावलं आहे. आज आयटम सॉंगसाठी नोरा निर्मात्यांची बनली आहे.
तसेच नोरा रिऍलिटी शोचं परीक्षणसुद्धा करते. नोराच्या व्यावसायिक आयुष्याबाबत सर्वच लोक जाणतात. आज आपण अभिनेत्रीच्या खाजगी आयुष्यावर एक नजर टाकणार आहोत.
नोरा फतेही अभिनेता अंगद बेदीसोबत रिलेशनशिपमध्ये होती. परंतु काही काळानंतर या दोघांचा ब्रेकअप झाला होता.
इतकंच नव्हे तर ब्रेकअपनंतर नोरा डिप्रेशनमध्ये गेली होती. ती तब्बल दोन महिने या आजाराशी झुंज देत होती.