नितीन नांदुरकर, जळगाव 03 नोव्हेंबर : निवडणूक आयोगाकडून शिवसेना पक्षाचं नाव आणि निवडणूक चिन्ह गोठवण्यात आलं आहे. त्यानंतर शिंदे आणि ठाकरे गटाला नवं नाव आणि निवडणूक चिन्ह देण्यात आलं होतं. यात ठाकरे गटाला 'मशाल' चिन्ह देण्यात आलं आहे. मात्र, एरंडोल येथे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या सभेत निवडणूक आयोगाच्या आदेशाची पायमल्ली झाल्याचं पाहायला मिळालं.
महिला पत्रकाराला दिलेल्या उत्तरामुळे संभाजी भिडे अडचणीत, महिला आयोगाची नोटीस
शिवसेना बाळासाहेब उद्धव ठाकरे गटाच्या महाप्रबोधन सभेत धनुष्यबाण चिन्हाचे ध्वज आणि पताका वापरल्या गेल्याचं पाहायला मिळालं. आमदार चिमणराव पाटील यांच्या मतदारसंघातील एरंडोल येथे ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांच्या महाप्रबोधन सभेत धनुष्यबाणाचे ध्वज आणि पताका लावण्यात आल्या होत्या.
ठाकरे आणि शिंदे गटाच्या वादावर निवडणूक आयोगाकडे सुरू असलेली शिवसेना नाव आणि पक्ष चिन्हाबाबत सुनावणी प्रलंबित असल्याने धनुष्यबाण आणि शिवसेना हे नाव न वापरण्याचा आदेश निवडणूक आयोगाने दिलेला आहे. मात्र, निवडणूक आयोगाचा आदेश असतानाही एरंडोल येथे ठाकरे गटाच्यावतीने आदेशाची पायमल्ली करण्यात आली. याठिकाणी सुषमा अंधारेंच्या सभेसाठी धनुष्यबाणाचे ध्वज आणि पताका लावण्यात आल्याचं पाहायला मिळालं
उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे वादामध्ये निवडणूक आयोगाने शिवसेनेचं धनुष्यबाण हे चिन्ह गोठवलं. तसंच दोन्ही गटांना शिवसेना हे नाव वापरण्यावरही बंदी घालण्यात आली. यानंतर निवडणूक आयोगाने दोन्ही गटांना वेगवेगळी नावे दिली आहेत. निवडणूक आयोगाने ठाकरे गटाला शिवसेना उद्धव बाळासाहेब आणि शिंदे गटाला बाळासाहेबांची शिवसेना हे नाव दिलं आहे. तसेच निवडणूक आयोगाने उद्धव ठाकरे गटाला धगधगती मशाल हे चिन्ह दिलं आहे. मात्र, तरीही ठाकरे गटाच्या सभेत धनुष्यबाणाचे ध्वज पाहायला मिळाले.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.