जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / "शिवसेनेचा युवराज" : आदित्य ठाकरे यांच्यावरील गाणे लाँच, माजी केंद्रीय मंत्री अनंत गीतेंच्या हस्ते लाँचिंग

"शिवसेनेचा युवराज" : आदित्य ठाकरे यांच्यावरील गाणे लाँच, माजी केंद्रीय मंत्री अनंत गीतेंच्या हस्ते लाँचिंग

"शिवसेनेचा युवराज" : आदित्य ठाकरे यांच्यावरील गाणे लाँच, माजी केंद्रीय मंत्री अनंत गीतेंच्या हस्ते लाँचिंग

माजी केंद्रीय मंत्री अनंत गीते यांच्या हस्ते अंधेरी पश्चिमेकडील एका विशेष कार्यक्रमांमध्ये या गीताचे लॉन्चिंग करण्यात आले.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई, 2 नोव्हेंबर : एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत बंडखोरी केल्यानंतर शिवसेनेत दोन गट पडले. यानंतर राज्यात महाविकास आघाडीचे सरकार कोसळले आणि त्यानंतर शिंदे गट-भाजपचे सरकार स्थापन झाले. त्यात एकनाथ शिंदे मुख्यमंत्री तर देवेंद्र फडणवीस हे उपमुख्यमंत्री झाले. राज्यात झालेल्या या इतक्या मोठ्या बंडखोरीनंतर आता सत्तासंघर्षानंतर उद्धव ठाकरे गट आणि एकनाथ शिंदे गट यांच्यामध्ये टोकाचा संघर्ष पाहायला मिळत आहे. यातच आता “शिवसेनेचा युवराज” या नावाने शिवसेना नेते आणि माजी मंत्री तसेच विद्यमान आमदार आदित्य ठाकरे यांच्यावरील गाणे लाँच करण्यात आले. शिवसेना नेते आणि आमदार आदित्य ठाकरे यांच्यावरील “शिवसेनेचा युवराज” असे शीर्षक असलेल्या गीताचे आज लॉन्चिंग करण्यात आले. माजी केंद्रीय मंत्री अनंत गीते यांच्या हस्ते अंधेरी पश्चिमेकडील एका विशेष कार्यक्रमांमध्ये या गीताचे लॉन्चिंग करण्यात आले. माजी मंत्री अनिल परब यांचे निकटवर्तीय असलेल्या शिवसेना अंधेरी पश्चिम विधानसभेचे संघटक संजय कदम यांनी हे गीत तयार केले आहे.

हेही वाचा -  ‘वेदांता’वरून आरोपांच्या फैरी, पण RTI मधून समोर आली Inside Story मी तुम्हाला सळो की पळो करुन सोडणार - ठाकरे आणि शिंदे गटातील वाद दिवसेंदिवस वाढत आहे. एका गटाच्या आरोपानंतर दुसऱ्या गटातून त्याला प्रत्त्युत्तर देण्यात येत आहे.  शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी काल धरणगाव येथे प्रबोधन सभा घेऊन शिंदे गटावर चौफेर टीका केली. यातही गुलाबराव पाटील यांच्यावर अंधारे यांनी सडकून टीका केली. मी तुम्हाला सळो की पळो करून सोडणार, आज तुम्हाला झोप येणार नाही, असा इशाराच त्यांनी मंत्री गुलाबराव पाटील यांना दिला आहे. गुलाबरावांना पाटलांना झोप लागणार नाही - गुलाबराव गद्दारीचा शिक्का घेऊन फिरताय. गुलाबराव पाटील पाणीवाला बाबा व्हायचं म्हणाताय. मात्र, 25 दिवस धरणगावमध्ये पाणी सुटतं नाही. पाणी पिनेवाला बाबा तुम्ही आहात. मात्र, ते पिण्याचं पाणी आहे की सायंकाळी ग्लास मध्ये घेण्यात येणारे पाणी आहे याचा शोध घ्यायला हवा. गुलाबराव पाटील मला बाई म्हणून एकेरी शब्दात बोलतात. मी तुमचा उल्लेख हजारवेळा भाऊ म्हणुन करते आणि तुम्ही माझा एकेरी उल्लेख करता. शेतकऱ्यांचे नुकसान झाले. पण, त्यावर चकार शब्द बोलत नाहीत. आज मी बोलल्यावर आज आमच्या भावाला यांना झोप लागणार नाही. उद्धव ठाकरे यांच्यावर बाहेर पडले नसल्याची टीका हे करतात. मात्र, तुम्ही काय केलं? आरत्या, दांडिया आणि श्राद्ध करत फिरत आहात.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात