जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / महिला पत्रकाराला दिलेल्या उत्तरामुळे संभाजी भिडे अडचणीत, महिला आयोगाची नोटीस

महिला पत्रकाराला दिलेल्या उत्तरामुळे संभाजी भिडे अडचणीत, महिला आयोगाची नोटीस

महिला पत्रकाराला दिलेल्या उत्तरामुळे संभाजी भिडे अडचणीत, महिला आयोगाची नोटीस

महिला पत्रकाराला दिलेल्या उत्तरामुळे शिवप्रतिष्ठान हिंदुस्तानचे संभाजी भिडे अडचणीत आले आहेत.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई, 2 नोव्हेंबर : महिला पत्रकाराला दिलेल्या उत्तरामुळे शिवप्रतिष्ठान हिंदुस्तानचे संभाजी भिडे अडचणीत आले आहेत. संभाजी भिडे यांना राज्य महिला आयोगाकडून नोटीस देण्यात आली आहे. कपाळाला टिकली नाही म्हणून बोलण्यास नकार देण्यामागील आपल्या भूमिकेचा खुलासा तात्काळ करा, अशी नोटीस महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी संभाजी भिडे यांना दिली आहे. काय म्हणाले संभाजी भिडे? संभाजी भिडे हे आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भेटायला मंत्रालयात आले होते. संभाजी भिडे यांनी मुख्यमंत्र्यांची सदिच्छा भेट घेतली, पण या भेटीनंतर महिला पत्रकाराने प्रश्न विचारल्यानंतर संभाजी भिडे यांनी वादग्रस्त विधान केलं.

News18

मंत्रालयातून बाहेर आल्यानंतर महिला पत्रकाराने संभाजी भिडे यांना मुख्यमंत्र्यांची भेट घ्यायचं कारण विचारलं, पण संभाजी भिडे यांनी या महिला पत्रकाराला उत्तर दिलं नाही. तुम्ही टिकली लावली नसल्यामुळे आपण उत्तर देणार नसल्याचं संभाजी भिडे म्हणाले. ‘आमची अशी भावना आहे, प्रत्येक स्त्री भारतमातेचं रूप आहे. भारत माता विधवा नाही. कुंकू लाव, मग तुझ्याशी बोलेन,’ अशी प्रतिक्रिया संभाजी भिडे यांनी महिला पत्रकाराला दिली आणि ते निघून गेले.

जाहिरात

काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांनी या मुद्द्यावरून संभाजी भिडेंवर टीका केली आहे. ‘भिडे यांच्या या भूमिकेचा तीव्र शब्दात निषेध करते. पुरोगामी महाराष्ट्राच्या भूमीत असे प्रकार कदापी सहन न होणारे आहेत. सध्या माध्यमकर्मी आणि पत्रकारांना सातत्याने अपमानाला सामोरं जावं लागतं आहे, हे निषेधार्ह आहे’, असं ट्वीट यशोमती ठाकूर यांनी केलं आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात