VIDEO : मुख्यमंत्री बदलाची महाराष्ट्रात चर्चा? शिवसेनेने केलं फडणवीसांना टार्गेट

महाराष्ट्रात मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी आंदोलन पेटलेलं असताना शिवसेनेनं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना टार्गेट केलंय.

News18 Lokmat | Updated On: Jul 25, 2018 04:15 PM IST

VIDEO : मुख्यमंत्री बदलाची महाराष्ट्रात चर्चा? शिवसेनेने केलं फडणवीसांना टार्गेट

मुंबई,ता. 25 जुलै : महाराष्ट्रात मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी आंदोलन पेटलेलं असताना शिवसेनेनं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना टार्गेट केलंय. महाराष्ट्र जळत असताना सरकारचं अस्तित्व जाणवत नाही. सरकारने पळपुटी भूमिका घेतली असून सकार अस्थिर झालंय अशी घणाघाती टीका शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केली आहे. सरकारने आंदोलकांशी चर्चा करावी अशी मागणीही त्यांनी केली. मुख्यमंत्री बदलाची महाराष्ट्रात चर्चा सुरू झालेली चर्चा ही इतर ठिकानी नाही तर भाजपमध्ये सुरू झाली असं म्हणत त्यांनी मुख्यमंत्र्यांना टार्गेट केलं.शिवसेना भाजप आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करण्याची एकही संधी सोडत नाही. मुख्यमंत्री कोंडीत कसे पकडले जातील याची शिवसेनेकडून काळजी घेतली जाते.

कायदा, सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झालेला असतांना मंत्री गप्प का - सुप्रीया सुळे

मराठा आंदोलकांनी नवी मुंबईत जाळल्या पोलिसांच्या गाड्या, पहा हा LIVE व्हिडिओ

राज्यात आंदोलन पेटलेलं असताना राऊत यांनी मुख्यमंत्री बदलाबद्दल केलेलं वक्तव्य हे संशय निर्माण करण्यासाठीच केलं गेलं अशी प्रक्रिया भाजपने व्यक्त केली आहे.सत्तेत सहभागी असूनही आंदोलनाची धग सरकारला बसत असताना शिवसेनेनं घेतलेल्या या भूमिकेमुळे भाजप आणि शिवसेनेतले मतभेद आणखी वाढण्याची शक्यता आहे.

VIDEO : वाशिममध्ये मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांचं मोबाईल टॉवरवर चढून आंदोलन

VIDEO : जिल्हाधिकारी कार्यालयाच्या छतावरून मराठा आंदोलकाचा आत्महत्येचा प्रयत्न

सामना या मुख्यपत्राला दिलेल्या मुलाखतीतही शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री, भाजप,पंतप्रधान आणि केंद्र सरकारवर सडकून टीका केली आहे. या पार्श्वभूमीवर आता थेट मुख्यमंत्रीच अस्थिर आहे असं वक्तव्य खासदार संजय राऊत यांनीच केल्याने दोनही पक्षांमधला वाद चिघळण्याचीच शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jul 25, 2018 03:54 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...

Live TV

News18 Lokmat
close