धुळे, 25 जुलै : धुळे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या छतावरून उडी मारून आत्महत्या करण्याचा प्रयत्न एका मराठा समाजाच्या व्यक्तीने केला आहे. जितेंद्र जांभळे असे आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या व्यक्तीचे नाव असुन पोलिसांच्या प्रसंगावधानामुळे वेळीच त्याला ताब्यात घेण्यात आलं. जिल्हाधिकारी कार्यलयाच्या छतावर लावण्यात आलेल्या कार्यायलयाच्या नावावून जांभळे यांनी आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. जांभळे यांचा छतावरून उडी मारण्याच्या क्षणभर आधी पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. जांभळेना छतावरून उतरविण्यात आले आहे. आज मराठा क्रांती मोर्चाने धुळे शहरात मराठा आमदारांची प्रतिकात्मक अंतयात्रा काढली होती, ती अंतयात्रा सुरू असतानाच हा आत्महत्येचा प्रयत्न झाल्याने संपुर्ण प्रशासन हादरून गेले होते.