कायदा, सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झालेला असताना मंत्री गप्प का - सुप्रीया सुळे

कायदा, सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झालेला असताना मंत्री गप्प का - सुप्रीया सुळे

महाराष्ट्रात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झालेला असताना, मराठा आरक्षणावर एकाही मंत्र्यानं चर्चेची तयारी दर्शवली नसल्याचा घणाघाती आरोप राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रीया सुळे यांनी केला.

  • Share this:

मुंबई, ता. 24 जुलै : मराठा आंदोलनाचे पडसाद आज लोकसभेतही उमटलेत. महाराष्ट्रात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झालेला असताना, मराठा आरक्षणावर एकाही मंत्र्यानं चर्चेची तयारी दर्शवली नसल्याचा घणाघाती आरोप राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रीया सुळे यांनी केला. कायदा आणि सुव्यवस्था धोक्यात आलेली असताना मंत्र्यांनी असे हातावर हात धरुन गप्प राहणे हे देशाकरीता घातक ठरत असल्याचे त्या म्हणाल्या.

मराठा आरक्षणाचा मुद्द्यावरुन आज मराठा क्रांती मोर्चाने संपूर्ण राज्यात बंद पुकारला आहे. या आंदोलनाला राज्यात काही ठिकाणी गालबोट लागले असून, कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. हे आंदोलन आणखी चिघळण्यापूर्वी मुख्यमंत्र्यांसह सत्तापक्षातील अन्य नेत्यांनी एकत्र येऊन चर्चा करायला हवी. मात्र, गेल्या चार-पाच दिवसांपासून सुरु असलेल्या आंदोलनावर एकही मंत्री चर्चा करण्यास तयार नाही. लोकसभा हे एक असे माध्यम आहे ज्याठिकाणी देशातील प्रत्येक मुद्द्यावर, प्रत्येक समस्येवर चर्चा केली जाते. गेल्या अनेक वर्षांपासून अनुत्तरित असलेल्या मराठा आरक्षण या मुद्द्यावरसुद्धा सभेत चर्चा होणे अपेक्षित आहे. हा मुद्दा आजपर्यंत अनुत्तरित राहण्याची कारणे काय, ती सोडविण्यास कोणत्या अडचणी आहेत. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन दिवसंदिवस बदलत असलेली परिस्थिती बदलणे आवश्यक आहे, कारण संपूर्ण जगाचं लक्ष आज भारताकडे लागून राहिले आहे.

Mumbai Band LIVE : अखेर मुंबई, ठाणे, नवी मुंबई, पालघर बंद मागे

मराठा आंदोलनामुळे काल २४ जुलैला मराठवाडा, विदर्भ, आणि पश्चिम महाराष्ट्राचा काही भाग पूर्णपणे बंद होता. आज २५ जुलैला या आंदोलनाची झळ मुंबई, नवी मुंबई, ठाणे, पालघर, रायगड जिल्ह्यांना बसली. मुंबईसह पुणे, नाशिक, सातारा या प्रमुख शहरांमध्ये आज आंदोलन सुरु झाले. मराठा समाजाला आरक्षण द्यावे, या मागणीसाठी सध्या राज्यभरात आंदोलन करण्यात येत आहे. मराठा आंदोलनामुळे काल मराठवाडा, विदर्भ, आणि पश्चिम महाराष्ट्राचा काही भाग ठप्प होता. पण या आंदोलनाची झळ आज मुंबईलाही बसली. मोठ्या संख्येने मोर्चेकरी रस्त्यावर उतरले. सरकारला या प्रश्नावर तोडगा काढल्याशिवाय पर्याय नसल्याचे सुप्रीया सुळे म्हणाल्या.

हेही वाचा..

मराठा आंदोलकांनी नवी मुंबईत जाळल्या पोलिसांच्या गाड्या, पहा हा LIVE व्हिडिओ

VIDEO : साताऱ्यात मराठा मोर्चावर पोलिसांचा लाठीचार्ज

Maratha Morcha : हातावर बाळासाहेबांचा टॅटू, तर मुखी मराठा आरक्षण !

 

First published: July 25, 2018, 3:14 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading