मुंबई, 17 फेब्रुवारी : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार सर्व मंत्र्यासमवेत आज घेणार बैठक बोलावली आहे. वाय बी चव्हाण सेंटर इथे सकाळी 11 वाजता ही बैठक पार पडेल. महाविकास आघाडी सरकारच्या कारभार, निर्णय यावर होणार चर्चा होणार आह्. एल्गार परिषद तपास एनआयए देणे त्यास राष्ट्रवादीचा असेलेला विरोध, अल्पसंख्यक मुस्लिम समाज आरक्षण, तसच येणारे अर्थसंकल्प अधिवेशन यावर चर्चा या बैठकीत होणार असल्याची माहिती आहे.
शरद पवार, गृहमंत्री अनिल देशमुख यांनी एल्गार तपास एनआयए देण्यास विरोध केला होता पण तरी ही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तपास एनआयए दिल्यान राष्ट्रवादी पक्षात नाराजीचा सूर आहे. काँग्रेस पक्षानेही संबंधित प्रकरणाबद्दल तपास एनआयए देण्यास विरोध केला होता. आता महाविकास आघाडीतील दोन पक्ष यावरून नाराज असल्याने त्याचे पडसाद काय उमटतात हे आजच्या एनसीपी बैठकीत दिसेल.
उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्यातील भांडणाचे मुख्य कारण म्हणजे भीमा कोरेगाव प्रकरणाची चौकशी एनआयएला देण्याचे सांगितले जात आहे. यापूर्वी भीमा कोरेगाव प्रकरणात महाराष्ट्र पोलीस चौकशी करणार असल्याचे सांगण्यात आले होते, परंतु त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी एनआयएकडे चौकशी सोपविण्याचा निर्णय घेतला. यानंतर पवार आणि ठाकरे यांच्यात वाद सुरू झाला.
पवारांनी व्यक्त केली होती नाराजी
भीमा-कोरेगाव प्रकरणातील काही महाराष्ट्र पोलीस अधिकाऱ्यांचे वर्तन आक्षेपार्ह असल्याचे सांगत शरद पवार यांनी शिवसेनेवर नाराजी व्यक्त केली होती. या अधिकाऱ्यांच्या वर्तनाचीही चौकशी व्हावी, अशी माझी इच्छा होती, परंतु ज्या दिवशी महाराष्ट्र सरकारच्या मंत्र्यांनी पोलीस अधिकाऱ्यांची भेट घेत केंद्राने संपूर्ण प्रकरण एनआयएकडे सोपवले. घटनेनुसार ते चुकीचे आहे, कारण गुन्हेगारी तपास हे राज्याच्या अखत्यारीत येतात.
इतर बातम्या - पुलवामा हल्ल्यानंतर पहिल्यांदाच भारतात खेळणार पाक संघ, मोदी सरकारने दिला व्हिसा
शरद पवारांनी रविवारी एल्गार परिषद प्रकरणात असा आरोप केला होता की महाराष्ट्रातील मागील देवेंद्र फडणवीस सरकारला काहीतरी लपवायचे होते, त्यामुळे या प्रकरणाचा तपास राष्ट्रीय तपास यंत्रणेकडे सोपविण्यात आला. NPR व्यतिरिक्त उद्धव ठाकरे यांनीही महाराष्ट्रातील राष्ट्रीय लोकसंख्या नोंदणी (NPR) ला मान्यता दिली आहे. ठाकरे म्हणाले की, एनपीआरमध्ये जनतेविरूद्ध काहीही नाही. मात्र, राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि कॉंग्रेस यात सहमत नाहीत. अशा परिस्थितीत पवार आणि ठाकरे यांच्यात एनपीआरबाबत तणाव आहे.
इतर बातम्या - बाबा गेल्यानंतर शिक्षणासाठी दमडी नव्हती, सायकलचं पंक्चर काढणारा आज झाले IAS
शिवसेना आणि काँग्रेसमध्ये दुरावा
दरम्यान, एकेकाळी एकमेकांचे प्रबळ विरोधक असलेले शिवसेना आणि काँग्रेस यांच्यातील शत्रुत्व वेगवेगळ्या मुद्द्यांवरून सुरू आहे. नागरिक दुरुस्ती कायदा आणि राष्ट्रीय लोकसंख्या यादी (एनपीआर) यावरुन शिवसेना-काँग्रेस दबून गेलेली आहे. सावरकरांचा मुद्दा अजूनही शांत झाला नव्हता. महाराष्ट्रातील काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी म्हटले आहे की, एनपीआरच्या तरतुदींना काँग्रेसचा विरोध आहे. या संदर्भात काँग्रेसचे मंत्री सरकारशी चर्चा करतील.
इतर बातम्या - आता भक्तांसोबत शंकर भगवानही करणार रेल्वेने प्रवास, 'हा' आहे आरक्षित सीट नंबर
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: BJP, Congress, Maharashtra, Mumbai, Narendra modi, NCP, Sharad pawar, Shiv sena, Shivsena