पुलवामा हल्ल्यानंतर पहिल्यांदाच भारतात खेळणार पाक संघ, मोदी सरकारने दिला व्हिसा

पुलवामा हल्ल्यानंतर पहिल्यांदाच भारतात खेळणार पाक संघ, मोदी सरकारने दिला व्हिसा

14 फेब्रुवारी रोजी भारतीय जवानांवर पुलवामा येथे झालेल्या भ्याड हल्ल्यानंतर पहिल्यांदाच पाक संघ भारतात येणार आहे. यासाठी सरकारने पाक खेळाडूंना व्हिसाही दिला आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 17 फेब्रुवारी : भारत-पाकिस्तान या कट्टर प्रतिस्पर्धी देशांमधील वाद काही लपलेले नाही. या वादाचा परिणाम खेळांवरही झाले आहेत. 2008मध्ये मुंबईत झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत-पाक यांच्यातील संबंध आणखी बिघडले. या हल्ल्यानंतर भारताने पाकविरुद्ध एकही क्रिकेट मालिका खेळलेली नाही. क्रिकेट वगळता इतर खेळांचा विचार केल्यास, भारत-पाक यांच्यात भारतीय भूमीवर काही सामने झाले आहेत. मात्र गेल्या वर्षी 14 फेब्रुवारी रोजी भारतीय जवानांवर पुलवामा येथे झालेल्या भ्याड हल्ल्यानंतर पहिल्यांदाच पाक संघ भारतात येणार आहे. यासाठी सरकारने पाक खेळाडूंना व्हिसाही दिला आहे.

दिल्लीमध्ये होणाऱ्या आशियाई कुस्ती चॅम्पियनशिपमध्ये पाकिस्तानचे काही खेळाडू भाग घेणार आहेत. या खेळाडूंचा भारतात खेळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. भारतीय कुस्ती संघाचे साहाय्यक सचिव विनोद तोमर यांनी या वृत्ताला दुजोरा दिला. आशियाई कुस्ती चॅम्पियनशिप ही स्पर्धा 18 ते 23 फेब्रुवारी या दरम्यान दिल्लीत होणार आहे. त्यामुळे या रविवारी भारत सरकारने पाकिस्तानी खेळाडूंना ही स्पर्धा खेळण्यासाठी परवानगी दिली आहे. दरम्यान, कोरोनाव्हायरसमुळे चीनमधील खेळाडूंना अद्याप परवानगी मिळालेली नाही.

वाचा-बाबा गेल्यानंतर शिक्षणासाठी दमडी नव्हती, सायकलचं पंक्चर काढणारा आज झाले IAS

पाकिस्तानचे 4 खेळाडू येणार भारतात

तोमर यांनी पत्रकारांना यासंबंधी माहिती देताना, कुस्ती संघाने शुक्रवारी खेळ सचिव राधेश्याम जुलानिया यांच्याशी भेट घेऊन याबाबत सविस्तर चर्चा केली. त्यानंतर गृह मंत्रालयशी चर्चा करून खेळाडूंना व्हिसा देण्यात आला. पाकिस्तान संघात 4 कुस्तीपटू, 1 प्रशिक्षक आणि 1 रेफरी यांचा समावेश असणार आहे. यात मोहम्मद बिलाल (57 किलो), अब्दुल रहमान (74 किलो), तैयब रजा (97 किलो), जमान अनवर (125 किलो) या खेळाडूंचा समावेश आहे.

वाचा-डोनाल्ड ट्रम्प येणार म्हणून गुजरातमध्ये तयारी; नीलगाय, कुत्र्यांना करणार गायब

परराष्ट्र मंत्रालयाकडून खेळाडूंना मिळाला व्हिसा

भारतीय कुस्ती संघाचे अध्यक्ष ब्रुज भूषण शरण सिंग यांनी खेळाडूंच्या व्हिसासाठी परराष्ट्र मंत्रालयाशी चर्चा केली होती. दरम्यान कोरोनाव्हायरसमुळे चीनच्या खेळाडूंना अद्याप व्हिसा मिळालेला नाही. एस जयशंकर यांना आंतरराष्ट्रीय संस्था युनायटेड वर्ल्ड रेसलिंग संस्थेने व्हिसा देण्याचा प्रस्तान पाठवला होता. त्यानंतर परराष्ट्र मंत्रालयाने खेळाडूंना व्हिसा दिला. दरम्यान भारतानं व्हिसा रोखला असता तर चीनमध्ये होणाऱ्या आशियाई ऑलिम्पिक क्लालिफायर टुर्नामेंटमधून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला असता.

वाचा-आता भक्तांसोबत शंकर भगवानही करणार रेल्वेने प्रवास, 'हा' आहे आरक्षित सीट नंबर

याआधी सरकारला अंधारात ठेऊन कबड्डी संघ पाकमध्ये पोहचला होता

विश्व कबड्डी चॅम्पियनसाठी (सर्किल स्टाईल) भारतीय संघ पाकिस्तानमध्ये (Pakistan) दाखल झाला आहे. मुख्य म्हणजे भारतीय संघ पाकमध्ये दाखल झाल्याबद्दल क्रीडा मंत्री किंवा राष्ट्रीय महासंघ यांपैकी कोणालाही माहिती नव्हती किंवा संघाला परवानगी देण्यात आली नव्हती. मात्र भारतीय संघ परस्पर या चॅम्पियनशीपमध्ये भाग घेण्यासाठी शनिवारी वाघा बॉर्डरकडून लाहोरमध्ये पोहचला. पहिल्यांदाच कबड्डी चॅम्पियनशीपचे आयोजन पाकिस्तानमध्ये केले गेले होते.

First published: February 17, 2020, 8:38 AM IST

ताज्या बातम्या