मुंबई, 17 फेब्रुवारी : IAS Success Story: आपल्याकडे सगळ्या सोईसुविधा असुनही आपण नेहमी कुरबुरी करत राहातो. मात्र शिक्षणासाठी एकही रुपया खिशात नसताना जिद्दीच्या आणि मेहनतीच्या जोरावर IAS होण्याचं स्वप्न साकार केलं आहे ते वरुण बरनवाल यांनी. हा कोणताही चमत्कार नाही तर केवळ प्रामाणिकपणे केलेल्या मेहनतीचं फळ आहे असं म्हणायला हवं. IAS ऑफिसर वरुण बरनवाल हे मुंबई उपनगर असलेल्या बोईसर इथले रहिवासी आहेत. त्यांनी 2013 रोजी झालेल्या UPSC परीक्षेत 32वं स्थान मिळवलं. सायकल पंक्चर काढणाऱ्या वरूण बरनवाल यांनी मिळवलेलं हे यश नक्कीच अव्वल आणि मोठं आहे. अर्थातच यामध्ये त्यांची आई आणि मित्र परिवार आणि नातेवाईकांचा मोठा वाटा आहे.
वरूण बरनवाल यांची घरची परिस्थिती त्यावेळी तशी गरीबीची होती. एक वेळ अशी होती की त्यांना सायकल पंक्चर काढण्याचं काम करावं लागत होतं. वरून सांगतात 'अभ्यासासोबत हे काम सुरू होतं. शिकण्याची जिद्द होती, आवड होती पण खिशात पैसे नव्हते. घरची परिस्थिती हालाकीची होती. त्यामुळे शिक्षणासाठी पैसे नसल्यानं पुढे दहावीची परीक्षा देऊन सायकलचं दुकान काढायचं असा निर्णय घेतला होता. मात्र त्यांच्या नशीबात काहीतरी वेगळंच होतं. 2006 साली दहावीची परीक्षा दिल्यानंतर दोन दिवसांत वडिलांचं निधन झालं. या सगळ्या स्थितीनंतर शिक्षण घेण्याची इच्छा असूनही परिस्थितीमुळे सोडून देण्याचा विचार केला. मात्र त्यानंतर काही दिवसांत दहावीचा निकाल लागला आणि शाळेत टॉपमध्ये आलो. माझा निकाल पाहून शिक्षक आणि कुटुंबीयांनी मला सहकार्य केलं. आम्ही काम करू पण तू शिकून मोठा हो, असं ते म्हणायचे. त्यानंतरची दोन वर्ष माझ्यासाठी फार कठीण होती. सकाळी 6 वाजता उठून कॉलेज आणि त्यानंतर दुपारी 2 ते 10 शिकवण्या घ्यायचो. त्यातून मला काही पैसे मिळायचे. त्यानंतर दुकानावर जाऊन हिशोब करायचा.'
हेही वाचा-बोर्डाच्या परीक्षेला जाण्याआधी 5 महत्त्वाच्या गोष्टी करा
शिक्षणासाठी असा मिळाला मदतीचा हात
वरूण यांना घराजवळच एक महाविद्यालय होतं तिथे त्याकाळी 10 हजार रुपये डोनेशन घेतलं जात होतं. मात्र पैसे नसल्यामुळे त्यांनी माघार घेण्याचा विचार केला होता. त्यावेळी वडिलांचा इलाज करणाऱ्या डॉक्टरांना ही गोष्ट कळली. त्यांनी वरूण यांना मदत केली आणि महविद्यालयात अॅडमिशन घेऊन दिली. मात्र पुढचा खर्च कसा काढायचा हा प्रश्न होताच. पण मग वरूण यांनी प्राचार्यांना आपली सगळी परिस्थिती सांगितली आणि महाविद्यालयाची फी माफ करण्याची नम्र विनंती केली. प्राचार्यांनीही वरूणची परिस्थिती लक्षात घेऊन त्यांना सपोर्ट केला.
त्यानंतर वरूण यांनी इंजिनरिगसाठी पुढे शिक्षण घेण्याची इच्छा होती. त्यावेळीही त्यांना शिक्षक आणि मित्रानं आर्थिक मदत केली. त्यामुळे माझं शिक्षण व्यवस्थित होऊ शकलं माझ्या यशामध्ये शिक्षक, डॉक्टर आणि माझ्या मित्रांचा मोलाचा वाटा आहे असं वरूण सांगतात.
वरूण यांना प्रायवेट कंपन्यांमधून खूप चांगल्या संधी येत असतानाही सरकारी नोकरी करण्याचा निर्णय घेतला. त्या अनुशंगानं त्यांनी UPSCची तयारी करण्यासाठी सुरुवात केली. येणारा खर्च त्यांच्या भावाने उचलला आणि पहिल्याच अटेम्टमध्ये त्यांनी UPSC परीक्षेत 32 वा क्रमांक मिळवला. निकाल पाहून वरूण यांना अश्रू अनावर झाले होते.
प्रामाणिकपणे केलेली मेहनत आपल्याला जगातील सगळ्या संकटांवर मात करण्याचं बळ देते आणि यश मिळवून देते असं वरूण बरनवाल सांगतात. त्यांच्या या जिद्दीला आणि प्रामाणिक मेहनतीला सलाम.
हेही वाचा- परीक्षा केंद्रावर जाण्याआधी विद्यार्थी आणि पालकांनी लक्षात ठेवा 7 गोष्ट
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.