मराठी बातम्या /बातम्या /बातम्या /

पंकजा मुंडे शिवसेनेते प्रवेश करणार का? संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया

पंकजा मुंडे शिवसेनेते प्रवेश करणार का? संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया

भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे या भाजप सोडण्याच्या चर्चा आहेत. त्या सेनेत प्रवेश करणार का प्रश्नावर शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे.

भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे या भाजप सोडण्याच्या चर्चा आहेत. त्या सेनेत प्रवेश करणार का प्रश्नावर शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे.

भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे या भाजप सोडण्याच्या चर्चा आहेत. त्या सेनेत प्रवेश करणार का प्रश्नावर शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे.

  • Published by:  Renuka Dhaybar

नाशिक, 02 डिसेंबर : भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे या भाजप सोडण्याच्या चर्चा आहेत. त्या सेनेत प्रवेश करणार का प्रश्नावर शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे. फक्त पंकजा मुंडेच नाही तर राज्यातले बडे नेते शिवसेनेच्या संपर्कात असल्याचा खळबळजनक दावा संजय राऊत यांनी केला आहे. ते नाशिकमध्ये आयोजित पत्रकार परिषद बोलत होते. यावेळी पंकजा मुंडे शिवसेनेत प्रवेश करणार का? असा प्रश्न विचारला असता येत्या 12 डिसेंबरला त्यांची भूमिका सगळ्यांना कळेल. पण फक्त पंकजाच काय तर राज्यातले अनेक नेते शिवसेनेच्या संपर्कात असल्याचा दावा संजय राऊत यांनी केला आहे.

भारतीय जनता पक्षाच्या नेत्या पंकजा मुंडे यांनी त्यांच्या ट्विटर अकाऊंटवरून भाजप हा शब्द काढला आहे. याआधी पंकजा मुंडे यांच्या प्रोफाईलचं यूजरनेम पंकजा मुंडे, भाजप असं होतं. पण आता ट्विटरवर पेजवर फक्त @Pankajamunde लिहलं आहे. त्यामुळे पंकजा मुंडे मोठा राजकीय निर्णय घेणार असल्याची सध्या चर्चा आहे. खरंतर, पंकजा मुंडे सध्या अस्वस्थ आहेत. विधानसभा निवडणुकीत झालेल्या पराभवामुळे त्या सध्या शांत असून त्याचं नेमकं काय चाललंय याची चर्चा गेली काही दिवस सुरू आहे. त्यातच त्यांनी फेसबुकवर एक पोस्ट लिहून आपल्या मनातल्या भावना व्यक्त केल्याने राज्याच्या राजकारणात जोरदार चर्चा सुरू झाली.

इतर बातम्या - राधाकृष्ण विखे पाटलांच्या गावात गोळीबार, तरुणाचा जागीच मृत्यू

12 डिसेंबर हा दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांचा वाढदिवस आहे. त्या दिवशी आपली पुढची वाटचाल जाहीर करणार असल्याचे संकेत पंकजा मुंडे यांनी दिले होते. गेले काही दिवस मी शांत आहे. कार्यकर्त्यांना मला बोलायचं आहे. आणि मलाही कार्यकर्त्यांशी बोलायचं आहे. मात्र सध्या मला शांतता पाहिजे आहे. मला माझ्याशी संवाद साधायचा आहे. हा संवाद झाल्यानंतर पुढची वाटचाल कशी करायची हे ठरवायचं आहे असं त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांना आवाहन करताना म्हटलंय. तसच 12 तारखेला गोपीनाथ गडावर येण्याचं आवाहनही त्यांनी केलं. त्यामुळे पंकजा मुंडे या भाजप सोडणार का? अशा चर्चा सध्या सुरू आहेत.

इतर बातम्या - रोहित पवारांचं एक असंही रूप, फेसबुक पोस्टने केलं सगळ्यांना भावूक...

पंकजा मुंडे भाजप सोडून वेगळी वाट निवडणार का? याची चर्चा सुरू झाली आहे. मात्र, पंकजा मुंडे यांचे विश्वासू महादेव जानकर यांनी मात्र न्यूज18 लोकमतशी बोलताना ही शक्यता फेटाळून लावली. पंकजाताई या कुठेही जाणार नाही, त्या भाजपमध्येच राहणार असल्याचंही ते म्हणाले. सोशल मीडियावर काय चर्चा होते त्याला काही अर्थ नाही. विधानसभा निकालानंतर त्या शांत आहेत हे खरं असलं तरी त्या लवकरच सक्रिय होतील असंही ते म्हणाले होते.

12 डिसेंबर या गोपीनाथ मुंडे यांच्या जयंतीच्या दिवशी पंकजा मुंडे शक्ती प्रदर्शन करणार असल्याची शक्यता व्यक्त केली जातेय. परळीत झालेल्या अटीतटीच्या लढतीत राष्ट्रवादीचे धनंजय मुंडे यांनी पंकजा मुंडे यांचा पराभव केला होता.

मोठी बातमी - देवेंद्र फडणवीसांना धक्का, आणखी एका आमदाराने सोडली साथ

" isDesktop="true" id="422200" >

First published:

Tags: Pankaja munde, Sanjay raut