मराठी बातम्या /बातम्या /बातम्या /

रोहित पवारांचं एक असंही रूप, फेसबुक पोस्टने केलं सगळ्यांना भावूक...

रोहित पवारांचं एक असंही रूप, फेसबुक पोस्टने केलं सगळ्यांना भावूक...

दिवसभर बैठका आणि सभांमध्ये त्यांना उपस्थित राहून काम करावं लागतं. पण यात त्यांचं कुटुंबाकडे मात्र सपशेल दुर्लक्ष होतं. या सगळ्यावर आमदार रोहित पवार यांनी एक भावनिक फेसबुक पोस्ट केली आहे.

  • Published by:  Renuka Dhaybar

जितेंद्र जाधव, प्रतिनिधी

बारामती, 02 डिसेंबर : राज्यात घडणाऱ्या घडामोडींमुळे राजकीय वातावरण ढवळून निघालं आहे. अशात सर्वच राजकीय नेते कामात व्यस्त असतात. दिवसभर बैठका आणि सभांमध्ये त्यांना उपस्थित राहून काम करावं लागतं. पण यात त्यांचं कुटुंबाकडे मात्र सपशेल दुर्लक्ष होतं. या सगळ्यावर आमदार रोहित पवार यांनी एक भावनिक फेसबुक पोस्ट केली आहे. रोजच्या कामातून वेळ काढून आपण कुटुंबासाठी वेळ दिला पाहिजे असा सल्ला या पोस्टमधून रोहित पवारांनी दिला आहे.

अधिवेशनाचं कामकाज संपवून रोहित पवार आणि आमदार डॉ.विश्वजित कदम हे एकाच गाडीने प्रवास करताना वाटेत त्यांनी खेळण्याचं दुकान पाहिलं. दोघांनाही दुकानात जाण्याचा मोह आवरला नाही. रोजची कामाची गडबड, त्यात वारंवार होणारे दौरे त्यामुळे कुटुंबियांसाठी वेळ मिळत नाही. घरी मुलांना आमची वारंवार आठवण येते. पण राजकारणाच्या सगळ्यात मोठ्या कुटुंबात वावरताना घरच्यांकडे दुर्लक्ष होतं असं रोहित पवारांनी पोस्टमध्ये म्हटलं आहे.

मोठी बातमी - फेसबुक पोस्टनंतर पंकजा मुंडेंनी ट्विटरवरून 'BJP' हटवलं, 12 डिसेंबरला मोठा निर्णय

फेसबुक पोस्टमध्ये काम म्हणाले रोहित पवार...

'कालच्या अधिवेशनाचे कामकाज संपवून याच घडामोडींवर चर्चा करत मी आणि आमदार डॉ.विश्वजित कदम गाडीने एकत्र निघालो होतो, साहजिकच गप्पा राजकीय रंगल्या होत्या पण अचानक रस्त्याच्या बाजूला एक खेळण्याचं दुकान दिसल्याबरोबर दोघांनाही त्या ठिकाणी जाण्याचा मोह आवरला नाही. कारण मुंबईत या सर्व गोष्टी घडत आहेत, आमदार म्हणून यात भाग घेऊन आम्ही आमचं कर्तव्य पार पाडत आहोत पण याकाळात आपल्या घराची विशेषतः आपल्या मुलांची आठवण देखील येत असते. राजकारणात काम करणे म्हणजे एका मोठ्या कुटुंबात वावरल्याचा अनुभव असतो, आपला मतदारसंघच आपलं कुटुंब बनत आणि त्यांच्यासाठी आम्ही आनंदाने काम देखील करत असतो परंतु कधी कधी या जबाबदारीत घराकडे थोडं दुर्लक्ष होत, एक बाप म्हणून जेवढा वेळ आपल्या मुलांना दिला पाहिजे तेवढा  देऊ शकत नाही  त्यामुळे या क्षेत्रात काम करणाऱ्या प्रत्येकानेच अशा छोट्या छोट्या प्रसंगातून नेहमीच आनंद शोधायचा प्रयत्न केला पाहिजे.

मोठी बातमी - देवेंद्र फडणवीसांना धक्का, आणखी एका आमदाराने सोडली साथ

आता घरी पोहचल्यानंतर मला भेटल्यानंतर आणि त्यांच्यासाठी घेतलेली खेळणी हातात बघून माझ्या मुलांच्या चेहऱ्यावर जो आनंद असेल तो माझ्यासाठी खूप समाधानकारक असेल.'

" isDesktop="true" id="422192" >

First published:

Tags: Rohit pawar