मराठी बातम्या /बातम्या /बातम्या /

देवेंद्र फडणवीसांना धक्का, आणखी एका आमदाराने सोडली साथ

देवेंद्र फडणवीसांना धक्का, आणखी एका आमदाराने सोडली साथ

निवडणुकांचा निकाल जाहीर झाल्यानंतर असा राजकीय पेच निर्माण झाला होता की त्यामुळे नेमकी सत्ता कोण स्थापन करणार यावरून सगळ्यांमध्ये संभ्रम होता. तसंच खरंतर किशोर जोरगेवार यांच्याबाबत झालं आहे.

निवडणुकांचा निकाल जाहीर झाल्यानंतर असा राजकीय पेच निर्माण झाला होता की त्यामुळे नेमकी सत्ता कोण स्थापन करणार यावरून सगळ्यांमध्ये संभ्रम होता. तसंच खरंतर किशोर जोरगेवार यांच्याबाबत झालं आहे.

निवडणुकांचा निकाल जाहीर झाल्यानंतर असा राजकीय पेच निर्माण झाला होता की त्यामुळे नेमकी सत्ता कोण स्थापन करणार यावरून सगळ्यांमध्ये संभ्रम होता. तसंच खरंतर किशोर जोरगेवार यांच्याबाबत झालं आहे.

  • Published by:  Renuka Dhaybar

चंद्रपूर, 02 डिसेंबर : राज्यात भाजप सगळ्यात मोठा पक्ष होता. त्यामुळे विधानसभा निवडणुकांआधी भाजप आणि शिवसेनेमध्ये जोरदार इनकमिंग झालं. अशात विधानसभा निवडणुकांमध्ये सगळ्यात मोठा पक्ष असून सुद्धा भाजपला विरोधी पक्षात बसण्याची वेळ आली. त्यामुळे आता भाजपमध्ये आऊटगोईंगला सुरुवात होण्याची शक्यता आहे. कारण, चंद्रपूरचे अपक्ष उमेदवार किशोर जोरगेवार यांनी शिवसेनेला पाठिंबा जाहीर केला आहे.  निवडणुकांचा निकाल जाहीर झाल्यानंतर असा राजकीय पेच निर्माण झाला होता की त्यामुळे नेमकी सत्ता कोण स्थापन करणार यावरून सगळ्यांमध्ये संभ्रम होता. तसंच खरंतर किशोर जोरगेवार यांच्याबाबत झालं आहे.

आमदारकी जिंकल्यानंतर किशोर जोरगेवार यांनी भाजपला बहुमत पाहून तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पाठिंबा दिला होता. मात्र, आघाडीचं सरकार येताच त्यांनी शिवसेनेला पाठिंबा जाहीर केला आहे. त्यामुळे कुठेतरी हा भाजपसाठी चंद्रपूरमधून धक्का मानला जातो. अजिप पवार यांच्यासोबत भाजपने हातमीळवणी केल्यानंतर घोडेबाजार टाळण्यासाठी भाजपने 6 अपक्ष आमदारांना सुरक्षित स्थळी ठेवलं होतं. यामध्ये जोरगेवारदेखील होते. पण बहुमत सिद्ध करण्याआधीच देवेंद्र फडणवीसांनी पदाचा राजीनामा दिला आणि सरकार कोसळलं.

इतर बातम्या - महाविकास आघाडीच्या कामाला सुरुवात, सुप्रिया सुळेंची मुख्यमंत्र्यांकडे ही मागणी

या राजकीय पेचात आघाडीने शिवसेनेसोबत सरकार स्थापन करण्याचा दावा केला. त्यामुळे जोरगेवार यांनी भाजपशी असलेले ऋणानुबंध तोडत बहुमत सिद्ध करताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पाठिंबा देत शिवसेनेच्या बाजूने मदतान केलं. तर चंद्रपूरचा विकास करण्यासाठी सत्ताधाऱ्यांसोबत असणं महत्त्वाचं असल्याचं जोरगेवार म्हणाले.

खरंतर, किशोर जोरगेवार यांनी समाजकार्य करण्यास प्रथम भाजपमधून सुरुवात केली. त्यानंतर ते 2014मध्ये विधानसभा निवडणूक लढण्यास इच्छुक होते. पण भाजपने त्यांना तिकीट नाकारलं. त्यावेळी जोरगेवार यांनी शिवसेनेत प्रवेश घेत 2014ची विधानसभा लढवली. पण त्यांचा पराभव झाला. यानंतर 2019ची विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी जोरगेवार हे काँग्रेसमधून इच्छुक होते. पण काँग्रेसने आधीच महेश मेंढे यांना एबी फॉर्म दिला होता. त्यामुळे अखेर जोरगेवार यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढली. आणि असंख्य मतांनी ते विजयी झाले.

विधानसभेचा निकाल लागल्यानंतर युतीचं सरकार येणार असल्याचं गृहित धरून जोरगेवारांनी भाजपला पाठिंबा दिला. पण आघाडीचं सरकार आल्यामुळे त्यांनी लगेच शिवसेनेला पाठिंबा दिला. यावर आता राजकीय वर्तुळात भाजपमध्ये आऊटगोईंग सुरू झालं अशी चर्चा आहे.

" isDesktop="true" id="422179" >

First published:

Tags: BJP, Devendra Fadnavis, Uddhav thackeray