विनया देशपांडे
मुंबई, 25 जुलै : मराठी बाणा आणि हिंदुत्वाची जाण शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी समाजाला दाखवून दिली. आज तोच मराठी बाणा या मराठा क्रांती मोर्चामध्येही पाहायला मिळाला. मुलूंडच्या शिवसेना प्रशासकीय रंजना काळे याही या मोर्चामध्ये सहभाही झाल्या आहेत. विशेष म्हणजे त्यांनी हातावर बाळासाहेब ठाकरे यांचा टॅटू गोंदवून घेतला आहे. बाळासाहेबांनी मराठी समाजाला न्याय दिला पण आताच्या सरकारने मराठ्यांचे हक्क काढून घेतले असं म्हणत त्यांनी भाजप सरकारचा निषेध केला आहे. 58 मोर्चे काढूनही आम्हाला न्याय मिळत नसेल तर याची बाळासाहेबांनाही लाज वाटेल, अशा शब्दात त्यांनी भाजपवर टीका केली आहे. शिवसेना कायम मराठी माणसाच्या बाजूने उभी राहिली आहे, असं मत रंजना काळे यांनी व्यक्त केलं.
Mumbai Band LIVE : मुंबईत ९ बेस्ट बस गाड्यांची तोडफोट, सार्वजनिक मालमत्तेचे लाखो रुपयांचे नुकसान
मराठा समाजाच्या मागण्यांसाठी आणि हक्कांसाठी काकासाहेब शिंदे यांनी जलसमाधी घेतली असून अनेकांनी आपले प्राण पणाला लावले. एवढं होऊनही सरकारला याची लाज वाटत नाही, म्हणून मराठा समाजाचे मुद्दे घेऊन शिवसेना रस्त्यावर आंदोलकांसोबत सहबागी झाली आहे. एवढं बोलून त्या थांबल्या नाहीत. काळे पुढे म्हणाल्या की, मराठा समाजाची स्मशानभूमी करण्याचा भाजप सरकारचा डाव आहे.
mumbai band : कुठे रेल रोको तर कुठे महिलांनी काढला मोर्चा, पहा हे PHOTOS
मराठा आरक्षण मिळालं नाही तर मी राजीनामा देईन असं कन्नडमधील शिवसेनेचे आमदार हर्षवर्धन जाधव यांनी म्हटलं आहे. मराठा समाजाला आरक्षण द्यावे, या मागणीसाठी सध्या राज्यभरात आंदोलन करण्यात येत आहे. मराठा आंदोलनामुळे काल २४ जुलैला मराठवाडा, विदर्भ, आणि पश्चिम महाराष्ट्राचा काही भाग पूर्णपणे बंद होता. आज २५ जुलैला या आंदोलनाची झळ मुंबई, नवी मुंबई, ठाणे, पालघर, रायगड जिल्ह्यांना बसणार आहे. मुंबईसह पुणे, नाशिक, सातारा या प्रमुख शहरांमध्ये आज आंदोलन भडकलेलं पहायला मिळालं. त्यात आता शिवसेनेचा भगवाही फडकताना दिसतोय.
हेही वाचा...
VIDEO : ठाण्यात मराठा समाज पेटला, रेल्वेस्थानकात केला रेल रोको
VIDEO : ठाण्यात आंदोलनाचा भडका, रस्त्यावर जाळले टायर
Mumbai band : पालघरमध्ये आंदोलक आक्रमक, संपूर्ण शहर पाडलं बंद !