S M L

Mumbai band : पालघरमध्ये आंदोलक आक्रमक, संपूर्ण शहर पाडलं बंद !

पालघर जिल्ह्यातील पालघर, बोईसर शहरात सध्या बंदला सुरुवात झालीये.

Updated On: Jul 25, 2018 09:45 AM IST

Mumbai band : पालघरमध्ये आंदोलक आक्रमक, संपूर्ण शहर पाडलं बंद !

पालघर, 25 जुलै : पालघर जिल्ह्यातील पालघर, बोईसर शहरात सध्या बंदला सुरुवात झालीये. बोईसर पूर्ण पणे बंद केलं असून येथे रिक्षा आणि एसटी बस सेवाही बंद करण्यात आली आहे. सध्या फक्त ग्रामीण भागातील लोकल एसटी वाहतूक सुरळीत सुरू आहे. तर लांब पल्ल्याचा बसेस बंद ठेवण्यात आल्या आहेत. तसेच बाजारपेठ आणि रिक्षा सेवाही बंद आहेत. वाडा शहर सुरु आहे. मात्र येथील बस वाहतूक फक्त सुरक्षेच्या कारणास्तव कुडुसपर्यंत असल्याचे सांगण्यात आले आहे. तर सीपीएमने पाठिंबा दिला असला तरी डहाणू, तलासरी, वाडा, जव्हार, मोखाडा सुरळीत सुरु आहे.

Mumbai Band: नवी मुंबईत ऐरोली ते वाशी बेस्ट बस सेवा पूर्णपणे बंद

तर दुसरीकडे ठाण्याच्या तीन हात नाका ते ज्ञानसाधना कॉलेज रोड आंदोलनकर्त्यांकडून जाम करण्यात आला आहे. मोठ्या संख्येने मोर्चेकरी रस्त्यावर उतरले आहे. त्यामुळे रस्त्यावर मोठी वाहतूक कोंडी झाली आहे. मोर्चेकरांकडून जोरदार घोषणाबाजी करण्यात येत आहे. या सगळ्या अंदाज घेत पोलिसांचा मोठा ताफा जागोजागी तैनात केला आहे. पण मोर्चेकरांच्या गर्दीने ठाणे पूर्व मार्ग पूर्णपणे जाम झाला आहे.



नवी मुंबई येथील घणसोली येथे आज पहाटे दोन बेस्ट बसवर दगडफेक झाल्यामुळे ऐरोली ते वाशीपर्यंतची बेस्ट सेवा पूर्ण बंद करण्यात आली आहे. त्यामुळे नवी मुंबईत जाण्यासाठी ठाणे- वाशी रेल्वेने प्रवास करणं सोयीस्कर ठरणार आहे. नवी मुंबईतील अनेक शाळा कॉलेजमधील मुलांना कोणतीही पूर्व कल्पना न देता घरी पाठवण्यात आले. या सगळ्या गदारोळात सर्वसामान्यांचे हाल होत आहेत.

हेही वाचा...

Mumbai band : ठाण्यात मराठा आंदोलक उतरले रस्त्यावर, पूर्व भागात मोठी वाहतूक कोंडी

Loading...
Loading...

भिवंडी 3 मजली इमारतीचा भाग कोसळला, 5 बचावले पण 1 महिलेचा मृत्यू

लोकलच्या दारात पदर अडकला,जीव थोडक्यात वाचला

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jul 25, 2018 09:44 AM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

  • I agree to receive emails from NW18

  • I promise to vote in this year's elections no matter what the odds are.

    Please check above checkbox.

  • SUBMIT

Thank you for
taking the pledge

But the job is not done yet!
vote for the deserving condidate
this year

Click your email to know more

Disclaimer:

Issued in public interest by HDFC Life. HDFC Life Insurance Company Limited (Formerly HDFC Standard Life Insurance Company Limited) (“HDFC Life”). CIN: L65110MH2000PLC128245, IRDAI Reg. No. 101 . The name/letters "HDFC" in the name/logo of the company belongs to Housing Development Finance Corporation Limited ("HDFC Limited") and is used by HDFC Life under an agreement entered into with HDFC Limited. ARN EU/04/19/13618
T&C Apply. ARN EU/04/19/13626

Live TV

News18 Lokmat
close