S M L
LIVE NOW

Mumbai Band LIVE :नवी मुंबईत आंदोलनाचा भडका, पोलिसांची दोन वाहनं जाळली

मराठा समाजाला आरक्षण द्यावे, या मागणीसाठी सध्या राज्यभरात आंदोलन करण्यात येत आहे

Lokmat.news18.com | July 25, 2018, 5:47 PM IST
facebook Twitter google Linkedin
Last Updated July 25, 2018
auto-refresh

Highlights

मुंबई, 25 जुलै : मराठा आंदोलनामुळे काल २४ जुलैला मराठवाडा, विदर्भ, आणि पश्चिम महाराष्ट्राचा काही भाग पूर्णपणे बंद होता. आज २५ जुलैला या आंदोलनाची झळ मुंबई, नवी मुंबई, ठाणे, पालघर, रायगड जिल्ह्यांना बसणार आहे. मुंबईसह पुणे, नाशिक, सातारा या प्रमुख शहरांमध्ये आज आंदोलन करण्यात येणार आहे. मराठा समाजाला आरक्षण द्यावे, या मागणीसाठी सध्या राज्यभरात आंदोलन करण्यात येत आहे. मराठा आंदोलनामुळे काल मराठवाडा, विदर्भ, आणि पश्चिम महाराष्ट्राचा काही भाग ठप्प होता. पण या आंदोलनाची झळ आज मुंबईला बसणार आहे. दरम्यान ठाण्यात सकाळपासूनच्या शांततेनंतर आता मराठा मोर्चेकरी रस्त्यावर उतरले आहेत. ठाण्याच्या तीन हात नाका ते ज्ञानसाधना कॉलेज रोड आंदोलनकर्त्यांकडून जाम करण्यात आला आहे. मोठ्या संख्येने मोर्चेकरी रस्त्यावर उतरले आहे.
5:27 pm (IST)

#MumbaiBandh LIVE : मुंबईत बंद मागे,नवी मुंबईत आंदोलनकर्त्यांवर पोलिसांनी सोडल्या अश्रूधुराच्या नळकांड्या https://goo.gl/Wx9Qhm


2:42 pm (IST)
Load More

Live TV

News18 Lokmat
close