Mumbai band : ठाण्यात मराठा क्रांती मोर्चाला हिंसक वळण लागलं आहे. मराठा समाजातील कार्यकर्त्यांनी जागोजागी जाळपोळ आणि तोडफोड करण्यास सुरूवात केली आहे. ठाणे रेल्वे स्थानकात आंदोलनकर्त्यांनी रेल रोको केला आहे तर माजीवडा येथे रस्त्यावर टायर जाळून वाहतूक बंद करण्यात आली आहे. ठाण्याच्या तीन हात नाका ते ज्ञानसाधना कॉलेज रोड आंदोलनकर्त्यांकडून जाम करण्यात आला आहे. मोठ्या संख्येने मोर्चेकरी रस्त्यावर उतरले आहे. त्यामुळे रस्त्यावर मोठी वाहतूक कोंडी झाली आहे. मोर्चेकरांकडून जोरदार घोषणाबाजी करण्यात येत आहे.