Mumbai band : ठाण्याच्या माजीवडा येथे रस्त्यावर टायर जाळून वाहतूक बंद करण्याचा मोर्चेकरांकडून प्रयत्न. ठाण्यात मराठा आंदोलनाचा भडका उडालेला पहायला मिळतो. ठाण्याच्या तीन हात नाका ते ज्ञानसाधना कॉलेज रोड आंदोलनकर्त्यांकडून जाम करण्यात आला आहे. मोठ्या संख्येने मोर्चेकरी रस्त्यावर उतरले आहे. त्यामुळे रस्त्यावर मोठी वाहतूक कोंडी झाली आहे. मोर्चेकरांकडून जोरदार घोषणाबाजी करण्यात येत आहे.