मुंबई, 24 जून : नथुराम गोडसे नाट्य साकारणारे अभिनेते शरद पोंक्षे हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यक्रमात उपस्थित राहिल्यानंतर उलटसुलट चर्चा सुरू झाली होती. अखेर यावर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आणि राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी खुलासा केला आहे.
'राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा गांधीवादी विचारांचा पक्ष आहे. गांधीहत्येचे समर्थन करणाऱ्या व्यक्तीवर गांधीवादी लोकांनी केलेल्या मदतीबद्दल आभार मानण्याची वेळ यावी, हाच महात्मा गांधींच्या विचारांचा विजय आहे' अशा शब्दात जयंत पाटील यांनी मत व्यक्त केले आहे.
धक्कादायक! कोरोनाचं थैमान, देशात आणखी एका आमदाराचा मृत्यू
'महात्मा गांधींची हत्या हे भारतातील पहिले दहशतवादी कृत्य होते. गांधींच्या हत्येचे समर्थन करणारे विचार, हेदेखील निश्चितच विकृत विचार आहेत' असं परखड मतही जयंत पाटलांनी व्यक्त केलं.
हक्काची कामं जातील, रोहित पवारांनी केलं राज ठाकरे स्टाईल मराठी तरुणांना आवाहन
राष्ट्रवादी वेल्फेअर ट्रस्टच्यावतीने बॅकस्टेज कलाकारांना कोरोना काळात 30 लाखांहून अधिक रक्कमेची आर्थिक मदत करण्यात आली. याबद्दल आभार मानण्यासाठी शरद पोंक्षे हे नाट्य परिषद पदाधिकारी, मराठी नाट्य परिषद अध्यक्ष प्रसाद कांबळी यांच्यासोबत राष्ट्रवादी पक्ष कार्यालयात आले होते. यापलीकडे शरद पोंक्षे यांचा आणि पक्षाचा कोणताही संबंध नाही आणि कधीच नसेल असा खुलासाही जयंत पाटील यांनी केला आहे.
संपादन - सचिन साळवे
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.