धक्कादायक! कोरोनाचं थैमान, देशात आणखी एका आमदाराचा मृत्यू

धक्कादायक! कोरोनाचं थैमान, देशात आणखी एका आमदाराचा मृत्यू

  • Share this:

कोलकाता, 24 जून : देशात कोरोना व्हायरसनं थैमान घातलं असतानाच आता धक्कादायक घटना समोर आली आहे. पश्चिम बंगालमधील तृणमूल काँग्रेस आमदार तमोनाश घोष यांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे. वयाच्या 60 व्या वर्षी रुग्णालयात कोविड-19 च्या उपचारादरम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतला. तमोनाश घोष यांची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आल्यानं त्यांच्यावर उपचार सुरू होते.

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी ट्वीट करून या संदर्भात माहिती दिली आहे. ममता बॅनर्जी यांनी तमोनाश घोष यांना श्रद्धांजली वाहिली आहे.

याआधी 10 जून ला द्रमुकचे आमदार जे. अंबाजगन यांचा कोरोनामुळे मृत्यू झाला होता. जे. अंबाजगन हे 62 वर्षांचे होते. चैन्नईतील खासगी रुग्णलयात त्यांच्यावर उपचार सुरू असताना कोरोनामुळे मृत्यू झाला होता.

संपादन- क्रांती कानेटकर

बातमी अपडेट होत आहे.

First published: June 24, 2020, 10:10 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading