पुणे, 24 जून : लॉकडाउनच्या काळात परप्रांतीय मजूर आपल्या गावी परतले होते. पण, आता अटी शिथिल झाल्यामुळे हे मजूर पुन्हा एकदा पुण्याकडे निघाले आहे. त्यामुळे राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी ‘आपल्या हक्काची कामं जाऊ शकतात, मराठी तरुणांनी तातडीने कंपन्यांत जॉईन होण्याचा विचार कराव्या’ असं आवाहन केलं आहे. लॉकडाउन 5 च्या टप्प्यात अटी शिथिल केल्यामुळे परप्रांतीय मजूर पुन्हा एकदा मुंबई, पुण्यात परतत आहे. याच मुद्यावरून रोहित पवार यांनी ट्वीट करून मराठी तरुणांना आवाहन केलं आहे. ‘पुण्यासारख्या शहरात रोज 17 हजारांपेक्षाही अधिक स्थलांतरित मजूर परतत आहेत. त्यामुळे येत्या काही दिवसात आपली हक्काची कामं जाऊ शकतात’ अशी भीती रोहित पवारांनी व्यक्त केली.
‘मराठी तरुणांनी तातडीने कंपन्यांत जॉईन होण्याचा विचार करावा. अनेकांनी चांगला प्रतिसाद दिला, पण अजून देण्याची गरज आहे. कोणतंही काम लहान-मोठं नसतं’ असंही रोहित पवार यांनी म्हटलं आहे. आतापर्यंत पुण्यात 30 हजार मजूर परतले विशेष म्हणजे, लॉकडाऊनचे निर्बंध शिथिल झाल्यानंतर पुण्यात 144 रेल्वेगाड्यातून 30 हजार मजूर पुण्यात परतले आहेत. 22 हजार थेट पुणे रेल्वे स्टेशनवर तर 8963 जण लोणी, दौंड, उरुळी कांचन अशा स्थानकांवर उतरले आहेत. कोरोनावर औषध आणणाऱ्या बाबा रामदेवांना दणका, डॉक्टराने गाठले पोलीस स्टेशन! लॉकडाउनच्या काळात 139 रेल्वे गाड्यातून 1 लाख 80 हजार मजूर मुळगावी गेले आहेत. पण, आता पुण्यात मोठ्या संख्येनं मजूर परत येत आहे. पुणे -पटणा, मुंबई- बंगलोर, भोपाळ-गोवा, मुंबई-भुवनेश्वर, मुंबई-हैदराबाद, मुंबई-गदग या गाड्या जेव्हा परत फिरतात तेव्हा या गाड्यातून साधारण 2000 प्रवासी रोज परत येत आहे, अशी माहिती माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली आहे. संपादन - सचिन साळवे