डोंबिवलीत कोरोनाचा तिसरा बळी, सात दिवसांची झुंज अपयशी

डोंबिवलीत कोरोनाचा तिसरा बळी, सात दिवसांची झुंज अपयशी

दरम्यान, कल्याण डोंबिवली पालिकेच्या परिसरात आज आणखी 3 रुग्ण आढळले आहे.

  • Share this:

डोंबिवली, 20 एप्रिल : महाराष्ट्रात कोरोनाचे संकट दिवसेंदिवस वाढत चालले आहे. मुंबई आणि उपनगरात कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत दररोज वाढ होत आहे. डोंबिवलीमध्ये आज आणखी एका कोरोनाबाधित रुग्णाचा मृत्यू झाल्यामुळे खळबळ उडाली आहे.

कल्याण डोंबिवली महापालिकेच्या परिसरात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत असतानाच डोंबिवली पश्चिम भागात एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. 13 एप्रिल रोजी या रुग्णाला कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं आहे. त्यानंतर तातडीने या रुग्णाला कस्तुरबा रुग्णालयात हलवण्यात आलं होतं. परंतु, उपचारादरम्यान, या रुग्णाचा आज सकाळी 8.30 वाजता मृत्यू झाला. त्यामुळे कल्याण डोंबिवली पालिकेच्या हद्दीत मृतांचा आकडा 3 वर पोहोचला आहे. यात डोंबिवलीत 2 आणि कल्याणमध्ये 1 रुग्णाचा समावेश आहे.

हेही वाचा - आमदार रवी राणा, खासदार नवनीत राणा यांचे चुकीचे स्वॅब सॅम्पल घेणं भोवलं

दरम्यान, कल्याण डोंबिवली पालिकेच्या परिसरात आज आणखी 3 रुग्ण आढळले आहे. कल्याण पूर्व आणि पश्चिम परिसरातून दोन पुरुष रुग्ण आढळले आहे तर डोंबिवली पश्चिम परिसरात एक 24 वर्षीय तरुणीला कोरोनाची लागण झाली आहे. कल्याण- डोंबिवलीत आतापर्यंत 78 जणांना कोरोनाची लागण झाली यापैकी 28 जणांना डिस्चार्ज देण्यात आला असून 47 जणांवर उपचार सुरू आहे.

दरम्यान, कोरोना व्हायरसमुळे जगभरात हाहाकार उडाला आहे. देशातही कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. सर्वाधिक रुग्ण हे महाराष्ट्रात आढळून आले आहे. आज राज्यात सर्वाधिक रुग्णांची नोंद झाली असून संख्याही तब्बल  4483 वर पोहोचली आहे.

महाराष्ट्रात रुग्णांची संख्या 4483 वर

राज्यात आज सकाळी 11 पर्यंत वेगवेगळ्या ठिकाणी कोरोनाबाधित रुग्णांची संख्या समोर आल्यामुळे चिंता व्यक्त केली जात आहे.  सकाळपर्यंत राज्यात वेगवेगळ्या भागात  283 रुग्णांची नोंद झाली आहे. यात सर्वाधिक रुग्ण हे मुंबई पालिकेच्या हद्दीतील आहे. मुंबईत 187 रुग्ण आढळले आहे.

हेही वाचा -वडिलांच्या अंत्यदर्शनाला न जाता योगी आदित्यनाथ लढताहेत कोरोनाशी लढाई

मुंबईपाठोपाठ वसई विरार 22, ठाणे 21, कल्याण डोंबिवली 16,  भिवंडी 1, मीरा भाईंदर 7, नागपूर 1, नवी मुंबई 9, पनवेल 6, पिंपरी चिंचवड 9, रायगड 2, सातारा 1 आणि सोलापूरमध्ये 1 रुग्ण आढळला आहे.

संपादन - सचिन साळवे

First published: April 20, 2020, 4:29 PM IST

ताज्या बातम्या