वडिलांच्या अंत्यदर्शनाला न जाता योगी आदित्यनाथ लढताहेत कोरोनाशी लढाई

वडिलांच्या अंत्यदर्शनाला न जाता योगी आदित्यनाथ लढताहेत कोरोनाशी लढाई

वडिलांच्या निधनाचं वृत्त कळाल्यानंतरही त्यांनी बैठक पूर्ण केली. त्यावेळी त्यांचे डोळे पाणावले होते.

  • Share this:

लखनऊ 20 एप्रिल: उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे वडिल आनंद सिंह बिष्ट यांचं आज सकाळी निधन झालं. दिल्लीतल्या एम्समध्ये त्यांच्यावर उपचार सुरू होते. ते 89 वर्षांचे होते. त्यांची किडनी निकामी झाली होती. आज सकाळी साडे दहाच्या सुमारास त्यांनी अंतिम श्वास घेतला. काही दिवसांपूर्वीच त्यांना एअरलिफ्ट करून उत्तराखंडमधून एम्समध्ये हलविण्यात आलं होतं. कोरोनाशी लढाई सुरू असल्याने आपण आपल्या प्रिय वडिलांच्या अंत्यदर्शनालाही जाऊ शकत नाही असं आदित्यनाथ यांनी म्हटलं आहे. त्याचबरोबर वडिलांचे अंत्यसंस्कार हे लॉकडाऊनच्या नियमांचं पालन करतच करा असा निरोप त्यांनी आपल्या आईला पाठवला आहे.

वडिलांच्या निधनाची बातमी जेव्हा मुख्यमंत्री आदित्यनाथ यांना कळविण्यात आली तेव्हा ते कोरोनाविरुद्ध धोरण ठरविणाऱ्या ‘टीम-11’ या गटाबरोबर बैठक करत होते. बातमी कळाल्यानंतर त्यांच्या डोळ्यात पाणी आलं. मात्र त्यांनी बैठक अर्धवट सोडली नाही. त्यानंतर त्यांनी पत्र लिहून आपल्या आईला भावूक निरोपही पाठवला.

त्यांनी पत्रात लिहिलंय की, पूज्य वडिलांच्या निधनाने झालेलं दु:ख शब्दात व्यक्त करू शकत नाही. सध्या कोरोनाशी लढाई सुरू असल्याने इच्छा असूनही अत्यंदर्शनाला येऊ शकत नाही आणि अंत्यसंस्कारतही सहभागी होऊ शकत नाही.

रिलायन्स फाउंडेशनचे जगातील सर्वात मोठं मिशन, 3 कोटी लोकांना करणार अन्नदान

त्यांच्या वडिलांवर 21 तारखेला हरिव्दारला अंतिम संस्कार होणार आहेत. अंतिम संस्कार करताना लॉकडाऊनच्या नियमांचं पालन करा आणि मोजकेच लोक उपस्थित राहा असंही त्यांनी आपल्या आईला कळवलं आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही आदित्यनाथ यांना फोन करून त्यांच्या वडिलांची विचारपूस केली होती. घटनेची माहिती मिळताच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि भाजपाध्यक्ष जे.पी. नड्डा यांनी एम्समध्ये जाऊन श्रद्धांजली अर्पण केली.

रोजंदारीवर पोट भरणाऱ्या केनियातील भारतीयाने 24000 भुकेल्यांना पुरवले अन्न-धान्य

तरुण वयातच आदित्यनाथ यांनी संन्यास घेऊन आपलं घर सोडलं होतं. त्यानंतर अनेक वर्षांनी ते गोरखपूरच्या मंदिराचे पीठाधीश्वर झाले होते.

(संपादन - अजय कौटिकवार)

 

 

First published: April 20, 2020, 3:57 PM IST

ताज्या बातम्या