Home /News /news /

आमदार रवी राणा, खासदार नवनीत राणा यांचे चुकीचे स्वॅब सॅम्पल घेणं भोवलं, आरोग्यमंत्र्यांकडे तक्रार

आमदार रवी राणा, खासदार नवनीत राणा यांचे चुकीचे स्वॅब सॅम्पल घेणं भोवलं, आरोग्यमंत्र्यांकडे तक्रार

आमदार रवी राणा आणि त्यांची पत्नी खासदार नवनीत राणा यांचे चुकीचे थ्रोट सॅम्पल घेतल्याने जिल्हा शल्य चिकित्सकाच्या अडचणीत वाढ झाली आहे.

अमरावती, 20 एप्रिल: बडनेरा मतदार संघाचे आमदार रवी राणा आणि त्यांची पत्नी खासदार नवनीत राणा यांचे चुकीचे थ्रोट सॅम्पल घेतल्याने जिल्हा शल्य चिकित्सकाच्या अडचणीत वाढ झाली आहे. अमरावती जिल्हा प्रशासन आरोग्य विभागाच्या हलगर्जीपणाबाबत आमदार रवी राणा यांनी राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांचेकडे तक्रार केली आहे. भ्रमणध्वनी संवाद साधत झालेल्या सर्व प्रकाराबाबत माहिती दिली आहे. आमदार रवी राणा यांनी ताप आल्याने दोन दिवसांपूर्वी अमरावतीच्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. खबरदारीचा उपाय म्हणून आमदार रवी राणा व खासदार नवनीत राणा यांचे थ्रोट स्वॅब जिल्हा कोविड रूग्णालयाच्या टीम मार्फत घेण्यात आले होते. हे स्वॅब तपासणीसाठी नागपूर येथील AIIMS मध्ये पाठवण्यात आले होते. मात्र, स्वॅब सॅम्पल चुकीचे असल्याचे AIIMS तज्ज्ञ डॉ. मीना यांनी खासदार नवनीत राणा यांना फोन करून माहिती दिली होती. तसेच त्यांचे सॅम्पल परत पाठवण्यास सांगितले होते. यापूर्वीही 40 ते 45 स्वॅब हे चुकीच्या पद्धतीने घेतल्याने ते नागपूर येथील AIIMS ने रिजेक्ट केले. हेही वाचा.. गर्भातील बाळ ऑनलाइन विकायला काढलं, औरंगाबादमधील खळबळजनक प्रकार आमदार रवी राणा यांनी आता याबाबत राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्याकडे तक्रार केली आहे. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. श्यामसुंदर निकम हे महत्त्वाच्या कामात हलगर्जीपणा करतात तर जिल्हाधिकारी केबिनच्या बाहेर निघत नसल्याची तक्रारीत म्हटलं आहे. या अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी करण्यात आली आहे. दरम्यान, आमदार रवी राणा व आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्या संभाषणाचा ऑडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हेही वाचा..लग्न करून बायकोला बाईकवर घेऊन जात होता, पोलिसांनी दिलं असं गिफ्ट काय आहे प्रकरण? अमरावती आरोग्य विभागाचा भोंगळ कारभार रविवारी पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला. आमदार रवी राणा आणि खासदार नवनीत राणा यांचे थ्रोट सॅम्पल चुकीचे घेतल्याची धक्कदायक घटना समोर आली. एवढंच नाही तर नागपूर AIIMS त्यांचे सॅम्पल परत पाठवले आहेत. आमदार रवी राणा हे 2 दिवसांपासून रेडियांट हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहेत. खबरदारी तसेच जनतेत संभ्रम निर्माण होऊ नये म्हणून त्यांनी स्वतः जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्यामसुंदर निकम यांच्याकडे जाऊन आपले थ्रोट स्वॅब तपासणी करण्याचे सुचवले. यानुसार शल्य चिकित्सकांनी त्यांच्याकडे कोविड रुग्णालयाची टीम पाठवून आमदार रवी राणा तसेच त्यांची पत्नी आणि खासदार नवनीत राणा यांचे थ्रोट स्वॅब सॅम्पल घेतले. सदर सॅम्पल हे नागपूर AIIMS येथे पाठवण्यात आले. परंतु AIIMS तपासणी प्रमुख डॉक्टर मीना यांनी भ्रमध्वनीद्वारे सदर सॅम्पल चुकीचे असून पुन्हा सॅम्पल पाठवण्याचे खासदार नवनीत रवी राणा यांना सांगितले. हेही वाचा.. जीवघेणं क्‍लोरीन डाइऑक्‍साइड कोरोनाव्हायरसवर औषध; काय आहे तज्ज्ञांचं म्हणणं? या भोंगळ कारभारावर शल्य चिकित्सक डॉ.श्यामसुंदर निकम यांना विचारले असता त्यांनी चुकीवर पांघरून घालून पुन्हा थ्रोट स्वॅब सॅम्पल घेण्यासाठी टीम पाठवीत असल्याचे सांगितले. या संतापजनक प्रकारामुळे कोरोनाविषयी जिल्हा प्रशासन किती गंभीर आहेत, हे दिसत आहे. याप्रकरणी खासदार नवनीत राणा यांनी जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ. निकम यांची चांगलीच खरडपट्टी काढल्याचं समजते. जिल्हा प्रशासनाची माहिती व आकडेवारी यावर कसा विश्वास ठेवावा, असा प्रश्न सर्वसामनांच्या मनात निर्माण होत आहे. वरिष्ठ स्तरावरून या प्रकाराची गांभीर्याने चौकशी व्हावी व दोषींवर कडक कारवाई व्हावी, अशी मागणी करण्यात येत आहे. नागरिकांच्या जीवाशी होणारा खेळ थांबवावा, अशी अपेक्षा नागरिक करीत आहेत. आमदार-खासदारांचे चुकीचे घेतले सॅम्पल जात असतील तर सर्वसामान्यांचे काय, असाही प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे. त्यामुळे आता त्यात दोषी आरोग्य अधिकाऱ्यांवर काय कारवाई होते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. संपादन संदीप पारोळेकर
Published by:Sandip Parolekar
First published:

पुढील बातम्या