जाहिरात
मराठी बातम्या / बातम्या / मेगाभरतीनंतर आता भाजपचं जोरदार प्लॅनिंग, युतीचं घोडं अडलेलं असताना 'या' जागांवर प्रचार

मेगाभरतीनंतर आता भाजपचं जोरदार प्लॅनिंग, युतीचं घोडं अडलेलं असताना 'या' जागांवर प्रचार

Mumbai: BJP President Amit Shah flanked by Shiv Sena President Uddhav Thackeray and Maharashtra Chief Minister Devendra Fadnavis during the announcement of an alliance between Shiv Sena and BJP for Lok Sabha and Assembly polls, in Mumbai, Monday, Feb 18, 2019. (PTI Photo/Shirish Shete) (PTI2_18_2019_000238B)

Mumbai: BJP President Amit Shah flanked by Shiv Sena President Uddhav Thackeray and Maharashtra Chief Minister Devendra Fadnavis during the announcement of an alliance between Shiv Sena and BJP for Lok Sabha and Assembly polls, in Mumbai, Monday, Feb 18, 2019. (PTI Photo/Shirish Shete) (PTI2_18_2019_000238B)

गुजरात, राजस्थान, मध्यप्रदेश, बिहार, उत्तर प्रदेश, तेलंगणा, गोवा या राज्यातून एकूण 60 प्रवासी(बहुतांश खासदार) कार्यकर्ते बैठकीला उपस्थित राहणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. 288 मतदारसंघात मतदारांची स्थानिक प्रश्न जाणून प्रचाराची रणनीती आजच्या बैठकीत आखली जाईल.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 14 सप्टेंबर : आगामी विधान सभा निवडणुका तोंडावर आल्या असल्याने राजकीय घडामोडींना वेग आला आहे. युतीचं घोडं अजून अडलेलं असतांना भाजपची मात्र 288 जागांवर प्रचाराची तयारी सुरू केली आहे. आगामी विधानसभा निवडणुकीसाठी प्रचाराची रणनीती ठरवण्यासाठी इतर राज्यातील खासदारांची फौज आज मुंबईत दाखल होणार आहे. निवडणूक सह प्रभारी केशव मौर्य यांच्या अध्यक्षतेखाली इतर राज्यातील प्रवासी कार्यकर्त्यांची दादरच्या वसंत स्मृती कार्यालयात बैठक पार पडणार आहे. गुजरात, राजस्थान, मध्यप्रदेश, बिहार, उत्तर प्रदेश, तेलंगणा, गोवा या राज्यातून एकूण 60 प्रवासी(बहुतांश खासदार) कार्यकर्ते बैठकीला उपस्थित राहणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. 288 मतदारसंघात मतदारांची स्थानिक प्रश्न जाणून प्रचाराची रणनीती आजच्या बैठकीत आखली जाईल. आज संध्याकाळी 7 वाजता राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष जे पी नड्डा, प्रभारी भुपेंद्र यादव, राष्ट्रीय महासचिव सरोज पांडे आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या नेतृत्वात मुंबईतील भाजपच्या सर्व खासदार, आमदार, नगरसेवक आणि जिल्हाध्यक्षांची बैठक बोलावण्यात आली आहे. या बैठकीत युतीत किंवा युतीशिवाय अशा दोन्ही प्लॅननुसार सर्व लोकप्रतिनिधींना प्रचाराची दिशा आणि रणनीती स्पष्ट करण्यात येईल.  आज राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष जे पी नड्डा मुंबईत मुक्काम करणार असून रविवारी ठाणे - कोकण लोकप्रतिनधींसोबत विधानसभेच्या आढावा बैठक घेणार असल्याचंही सांगण्यात येत आहे. भाजपला 50-50 फॉर्म्युला तुर्तास अमान्य.. शिवसेनेला युतीसाठी दिली ही नवी ‘ऑफर’ लोकसभा निवडणुकीत ‘कमळ’ फुलल्यानंतर, अभूतपूर्व यश मिळवल्यानंतर भाजप नेत्याचा आत्मविश्वास चांगलाच वाढला आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत शिवसेनेसोबत युती करण्याचा निर्णय भाजपने घेतला आहे. मात्र, युतीसाठी शिवसेनेचा 50-50 फॉर्म्युला भाजपने तुर्तास अमान्य केला आहे. सध्या महाराष्ट्रात भाजपचे 122 आमदार आहेत. त्यामुळे ही मागणी भाजपला मान्य नाही. त्यामुळे शिवसेनेला युतीसाठी भाजपने नवी ऑफर दिल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. इतर बातम्या - बाप्पाच्या विसर्जनाला पाणी नाही म्हणून लातूरकरांचा जगावेगळा उपक्रम, सगळ्या मुर्ती…! विधानसभा निवडणुकीत 135 पेक्षा कमी जागा स्वीकारण्यास आपण असमर्थ असल्याचे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना कळवले असताना भाजपने शिवसेनेला 120 जागांची ऑफर दिली आहे. विशेष म्हणजे भाजपने स्वत: 156 जागा लढवण्याचा निर्णय भाजपने घेतला आहे. उर्वरीत 12 जागा मित्र पक्षांसाठी सोडणार असल्याचे भाजपने म्हटले आहे. आता यावर शिवसेना काय भूमिका घेते याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. इतर बातम्या - बिझनेस ट्रिपवर गेलेल्या व्यक्तीचा SEX करताना मृत्यू, कोर्टाकडून धक्कादायक निकाल भाजपने विधानसभा स्वबळावरच लढवावी… दुसरीकडे, भाजपने विधानसभा निवडणूक स्वबळावरच लढवाव्यात, अशी मागणी पक्षातील काही ज्येष्ठ नेत्यांनी केली आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांची सध्या भाजपमध्ये ‘मेगाभरती’ सुरू आहे. त्यामुळे भाजपला त्यांच्या जागांची अदलाबदल हवी आहे. त्यामुळेच स्वबळावर लढण्याचा आग्रह केला जात आहे. दरम्यान, लोकसभा निवडणुकीत भाजपच्या नेत्यांना महाराष्ट्रात स्वबळावर लढून यश मिळवण्याचा आत्मविश्वास नव्हता. त्यामुळे शिवसेनेची मनधरणी करण्याचे प्रयत्न भाजपचे तत्कालीन राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांना करावे लागले होते. इतर बातम्या - केंद्रातलं सरकार हे ‘दारुड्यां’चं, प्रकाश आंबेडकरांची बोचरी टीका VIDEO: मागे जाऊन बसायला सांगितल्याचा राग, महिला कंटक्टरला केली बेदम मारहाण

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात