बिझनेस ट्रिपवर गेलेल्या व्यक्तीचा SEX करताना मृत्यू, कोर्टाने दिला धक्कादायक निकाल

झेव्हिअर एक्स नावाच्या व्यक्तीला 2013मध्ये रेल्वे सेवा कंपनीने फ्रान्समध्ये आयोजित एका विझनेस बैठकीसाठी पाठवलं होतं. परंतु एका महिलेशी लैंगिक संबंध ठेवताना व्यक्तिचा हृदयविकाराने जागीच मृत्यू झाला

News18 Lokmat | Updated On: Sep 13, 2019 08:46 PM IST

बिझनेस ट्रिपवर गेलेल्या व्यक्तीचा SEX करताना मृत्यू, कोर्टाने दिला धक्कादायक निकाल

पॅरिस, फ्रान्स, 13 सप्टेंबर : बिझनेस निमित्ताने दौर्‍यावर गेलेल्या एका व्यक्तीचा लैंगिक संबंधा वेळी मृत्यू झाला आहे. पॅरिसच्या कोर्टाने या प्रकरणात व्यक्तीच्या कंपनीला जबाबदार धरलं आहे. झेव्हिअर एक्स नावाच्या व्यक्तीला 2013मध्ये रेल्वे सेवा कंपनीने फ्रान्समध्ये आयोजित एका विझनेस बैठकीसाठी पाठवलं होतं. परंतु एका महिलेशी लैंगिक संबंध ठेवताना व्यक्तिचा हृदयविकाराने जागीच मृत्यू झाला. 8 वर्षे चाललेल्या या प्रकरणात कोर्टाने आज निकाल दिला आहे.

या प्रकरणात, कंपनीने कोर्टात असा युक्तिवाद केला की ज्या हॉटेलवर कर्मचाऱ्याला बैठकीसाठी पाठवलं गेलं होतं तिथे तो पोहोचलाच नाही. मीडिया रिपोर्टनुसार पॅरिस कोर्टाने कंपनीला कर्मचार्‍याच्या मृत्यूसाठी जबाबदार धरू नये, असं आवाहन केलं. कारण कंपनीने काम सोडून त्ला वैयक्तिक आयुष्यासाठी तिथे पाठवलं नव्हतं आणि ते कंपनीच्या कामकाजापेक्षा पूर्णपणे वेगळे होते.

कंपनीचं म्हणणं कोर्टाने फेटाळलं...

कोर्टाने कंपनीचा युक्तिवाद मान्य केला नाही आणि मृत कर्मचार्‍याच्या कुटूंबाची भरपाई द्यावी असं सांगितलं. बीबीसीच्या वृत्तानुसार, न्यायाधीशांनी आपल्या निर्णयामध्ये म्हटले आहे की, 'बिझनेस दौर्‍यावर असलेल्या कर्मचाऱ्यास संपूर्ण कामकाजासाठी संरक्षण असलं पाहिजं' बरं इतकंच नाही तर झेव्हियर बिझनेस दौर्‍यावर गेला होता हे कंपनीला सिद्ध करता आले नाही.

मित्राने केलेल्या विनयभंगाबद्दल गर्लफ्रेंडनं सांगितलं, एका रात्रीत प्रियकराने केला खेळ खल्लास!

Loading...

प्रेम प्रकरणातून हत्या होण्याचं आणि गुन्हा होण्याचे प्रकार गेल्या काही दिवसांमध्ये वाढले आहेत. देशात प्रत्येक ठिकाणी गुन्हेगारी वाढत चालली आहे. गुन्ह्याचा असाच एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. गर्लफ्रेंडची छेड काढल्यामुळे एका तरुणाने मित्राची हत्या केल्याचं समोर आलं आहे. पोलिसांनी या प्रकरणात आरोपीला ताब्यात घेतलं आहे. शहराच्या महत्त्वाच्या भागात हा प्रकार घडल्यामुळे संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

इतर बातम्या - मित्राने केलेल्या विनयभंगाबद्दल गर्लफ्रेंडचा खुलासा, प्रियकराने दोस्ताला संपवलं

आरोपीवर स्वत: च्या मित्राची हत्या केल्याचा आरोप आहे. प्रेयसीशी छेडछाड केल्याच्या आरोपावरून आरोपी तरुणाने त्याच्या मित्रावर चाकूने हल्ला करून फरार झाला. यानंतर स्थानिक लोकांच्या मदतीने जखमीला रुग्णालयात नेण्यात आलं पण तिथे त्याला मृत घोषित करण्यात आलं. याप्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली पुढील तपास सुरू असल्याची माहिती देण्यात आली आहे.

इतर बातम्या - सर्जरीनंतरही पुन्हा-पुन्हा उगवतं या व्यक्तीच्या डोक्यावर शिंग, डॉक्टरही वैतागले

छत्तीसगडच्या दुर्गतील भिलाई नगर पोलीस स्टेशन परिसरातील सेक्टर 9मधल्या दुर्गा पंडालजवळ रात्रीच्या वेळी आरोपी शुभम थॉमसने त्याचा मित्र कैलास गुप्तावर चाकूने हल्ला केला. प्रेयसीला छेडल्याबद्दल शुभम कैलासवर रागावला होता. प्रेयसीला हात लावल्यामुळे रागाच्या भरात कैलास गुप्ता याच्यावर शुभमने चाकूने हल्ला केला आणि फरार झाला. या घटनेनंतर काही तासांनी पोलिसांनी कुम्हारी टोल प्लाझा जवळून आरोपीला अटक केली. मयत कैलास गुप्ता मॉडेल टाऊन स्मृती नगर इथला रहिवासी आहे.

इतर बातम्या - या काकूंनी केली 'गलती से मिस्टेक', VIDEO होतोय तुफान व्हायरल

हत्येचं सांगितलं वेगळंच कारण...

चौकशी दरम्यान शुभमने पोलिसांना सांगितलं की, काही दिवसांपूर्वी कैलासने त्याच्या प्रेयसीचा विनयभंग केला होता. शुभम हा कैलासचा बदला घेण्याचा प्रयत्नात होता. मृतक आपल्या मित्रांसह बाहेर फिरायला गेला होता. त्यावेळी सर्वांनी जोरदार मद्यपान केलं होतं. दारूच्या नशेत असलेल्या कैलासचा शुभमशी तिच्या मैत्रिणीविषयी वाद झाला आणि शुभमने कैलासवर चाकूने वार करून पळ काढला. दुर्ग एएसपी रोहित झा यांनी सांगितलं की, चौकशीनंतर पोलिसांनी आरोपी शुभमविरूद्ध खुनाचा गुन्हा दाखल करून त्याला तुरूंगात पाठवलं आहे.

SPECIAL REPORT : विधानसभा अध्यक्षांची राजीनामा सर्व्हिस, आले थेट बाईकवरून!

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags: france
First Published: Sep 13, 2019 08:46 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...