जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / केंद्रातलं सरकार हे 'दारुड्यां'चं, प्रकाश आंबेडकरांची बोचरी टीका

केंद्रातलं सरकार हे 'दारुड्यां'चं, प्रकाश आंबेडकरांची बोचरी टीका

केंद्रातलं सरकार हे 'दारुड्यां'चं, प्रकाश आंबेडकरांची बोचरी टीका

‘अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्पने मोदीला दिलेल्या एका टाळीची किंमत भारतातील शेतकऱ्यांना मोजावी लागतेय.’

  • -MIN READ
  • Last Updated :

विजय कमळे पाटील, जालना 13 सप्टेंबर : केंद्र सरकार हे ‘दारुड्यां’चं सरकार आहे. दारुडा जसे स्वतःचे पैसे संपल्यावर चोऱ्या करतो, घरातलं समान विकतो. तसच केंद्र सरकार आता  RBI च्या पैशावर डल्ला मारतंय अशी बोचरी टीका त्यांनी केलीय. आतापर्यंत कोणीच असं केलं नाही.  हे सरकार झिंगलेल्या माणसासारखे चालतंय. हम करे सो कायदा आणि विरोधात बोललं तर देशद्रोही अशी लेबलं लावली जात आहेत. RSS आम्हाला देशभक्ती शिकवतेय हे दुर्भाग्य असल्याची टीकाही त्यांनी केली. जालना येथे आयोजित बलुतेदार-आलुतेदार निर्धार मेळाव्यात ते बोलत होते. पाकव्याप्त काश्मीरच स्वतंत्र्य संविधान रद्द करून केंद्र शासित राज्य जाहीर करताच पाकव्याप्त काश्मीरचा विषयच राहिला नाही. पाक युद्ध करणारच नाही. तर सरकार त्यांना प्रत्युत्तर कसं देणार असा सवालही त्यांनी केला. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्पने मोदीला दिलेल्या एका टाळीची किंमत भारतातील शेतकऱ्यांना मोजावी लागतेय अशी टीकाही त्यांनी केली. ‘राजे गेले, सेनापती गेले पण मावळे आमच्या सोबत’ मनसे निवडणूक लढविणार का? सस्पेन्स कायम लाव रे तो व्हिडीओ असं म्हणत लोकसभा निवडणुकीत प्रचाराची रणधुमाळी उडविणाऱ्या राज ठाकरे यांची तोफ विधानसभा निवडणुकीत धडाडणार का? याबाबत सध्या संभ्रम निर्माण झालाय. यासंदर्भात चर्चा करण्यासाठी राज ठाकरे यांनी कृष्णकुंजवर आज नेत्यांची बैठक बोलवली होती. मात्र ही बैठक कुठल्याही निर्णयाविनाच संपली. विधानसभा निवडणुकीबाबात काय भूमिका घ्यायची हे राज ठाकरे लवकरच सांगतील अशी माहिती मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांनी दिली. उदयनराजेंनी ‘या’ 2 अटींवरच घेतला भाजप प्रवेशाचा निर्णय! त्यामुळे राज ठाकरे निवडणूक लढणार नाहीत अशी चर्चा सुरू झालीय. या बैठकीनंतर मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांनी माहिती देताना सांगितलं की, बैठकीत काही कार्यकर्त्यांनी निवडणूक लढवावी आणि काही कार्यकर्त्यांनी निवडणूक लढवू नये अशी भूमिका मांडली. राज ठाकरे यांनीही आपले विचार व्यक्त केलेत. आता काय निर्णय घ्यायचा हे राज ठाकरे ठरवणार असून लवकरच ते आपला निर्णय जाहीर करतील अशी माहिती नांदगावकर यांनी दिली.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात