जाहिरात
मराठी बातम्या / बातम्या / पुणेकरांनो सावधान! मास्क न वापरणाऱ्यांसाठी अजित पवार घेणार मोठा निर्णय

पुणेकरांनो सावधान! मास्क न वापरणाऱ्यांसाठी अजित पवार घेणार मोठा निर्णय

त्याचबरोबर टेस्टिंगची संख्याही वाढत असल्याने रूग्णांचं प्रमाणही वाढत आहे.

त्याचबरोबर टेस्टिंगची संख्याही वाढत असल्याने रूग्णांचं प्रमाणही वाढत आहे.

पुण्यात मास्क न वापरण्यावर अजित पवार हे मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत असल्याची माहिती समोर येत आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

पुणे, 28 ऑगस्ट : राज्यात एकीकडे कोरोनाचा संसर्ग वाढत आहे तर दुसरीकडे रुग्ण बरे होण्याचा दरही वाढत आहे. अशात कोरोनाची लक्षण, रोजचे आकडे, समोर येणाऱ्या धक्कादायक घटना आणि लॉकडाऊनचे नियम यात रोज म्हटलं तरी बदल होतात. त्यामुळे नागरिकांमध्येही याबद्दल संभ्रम आहे. राज्यात सध्या गणेशोत्सवाची धूम आहे. त्यामुळे रस्त्यावरची गर्दी पाहता नागरिकांनाही कोरोनाचा विसर पडल्याचं चित्र आहे. या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर पुण्यात मास्क न वापरण्यावर अजित पवार हे मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत असल्याची माहिती समोर येत आहे. मास्क न वापरल्यास पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये एक हजार रुपये दंड करण्याचा विचार अजित पवार करत असल्याचं सांगण्यात येत आहे. आजच्या बैठकीत यावर चर्चा होणार असून त्यानंतर निर्णय घेण्यात येणार आहे. दरम्यान, पुण्यातील कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. पुण्यात सध्या 28 हजार 142 एकूण कोरोना रुग्ण आहेत. तर, 872 जणांचा मृत्यू झाला आहे. मात्र नुकत्याच एक सर्व्हेमधून पुण्यातील 60 आणि त्याहून अधिक वय असलेल्या 922 जणांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. हा सर्व्हे पुणे आणि पिंपरी चिंचवड पालिकेच्या वतीने करण्यात आला होता. वडिलांनीच संपवला लेकाचा 5 वर्षांचा संसार, सुनेला कुऱ्हाडीने वार करून केलं ठार या सर्व्हेअंतर्गत पुण्यातील एकूण 2.46 लाख पुण्यातील तर 3500 पिंपरी चिंचवडमधील लोकांची तपासणी करण्याती आली. यात 922 नवीन रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे आढळून आले, ज्यांचे वय 60 आणि त्याहून अधिक होते. या सर्व्हेमुळे शहरातील अति धोकादायक, कमी धोकादायक अशा रुग्णांची विभागणी करून त्यांच्यावर उपचार करणे शक्य झाले. पुढच्या 24 तासांसाठी हवामान खात्याचा इशारा, राज्यात या भागात मुसळधार पाऊस पुण्याचे आयुक्त सौरभ राव यांनी टाइम्स ऑफ इंडिया या वृत्तपत्राला दिलेल्या माहितीत, “आम्ही एक अॅप तयार केले आहे. ज्याचे नाव आहे वयश्री. यात अॅपमध्ये वयस्कर व्यक्तींची माहिती साठवली जात आहे. वाद पेटला! छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर बसवला रायन्ना यांचा पुतळा याआधी प्रत्येक घराघरात जाऊन सर्व्हे करावा लागत होता. आता या अॅपच्या माध्यमातून सहज माहिती उपलब्ध होत आहे. सर्व्हेनंतर जास्त कोरोना रुग्ण असलेल्या परिसरांत नोडल ऑफिसर तैनात करण्यात आले आहेत. त्यांच्याकडे पल्स ऑक्सिमीटर देण्यात आले आहे”, असे सांगितले. तर, पिंपरी चिंचवडमधीलही 2 लाख वयस्कर व्यक्तींची तपासणी करण्यात आली.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात