जाहिरात
मराठी बातम्या / बातम्या / Weather Alert: पुढच्या 24 तासांसाठी हवामान खात्याचा इशारा, राज्यात या भागात कोसळणार मुसळधार पाऊस

Weather Alert: पुढच्या 24 तासांसाठी हवामान खात्याचा इशारा, राज्यात या भागात कोसळणार मुसळधार पाऊस

Weather Alert: पुढच्या 24 तासांसाठी हवामान खात्याचा इशारा, राज्यात या भागात कोसळणार मुसळधार पाऊस

मुंबई शहरात काही भागात मध्यम ते हलका स्वरूपाचा पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 28 ऑगस्ट : गेले काही दिवस महाराष्ट्रात पावसाने विश्रांती घेतली आहे. पण पुढील 24 तासांत महाराष्ट्राच्या काही भागांमध्ये मुसळधार पाऊस हजेरी लावणार आहे. मुंबई शहरात काही भागात मध्यम ते हलका स्वरूपाचा पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तर दुसरीकडे ठाणे, रायगड जिल्ह्यात काही भागात मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, राज्यात विदर्भात आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये देखील पुढील 24 तासांत मुसळधार पावसाचा अंदाज कुलाबा वेधशाळेने वर्तविला आहे. गेले काही दिवस राज्यात पावसाने विश्रांती घेतली होती. घाटमाथ्यावर काही भागात अधूनमधून पाऊस हजेरी लावत होता पण राज्यात मुसळधार पाऊस थांबला होता. चालकाचा डोळा लागला अन् गाडी पुलावरून नदीत कोसळली, अपघातानंतरचा भयंकर VIDEO समोर आता पुढील 24 तासांत विदर्भ, मराठवाडा तसंच उत्तर कोकणात मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला असल्याने स्थानिक यंत्रणादेखील सतर्क झाली आहे. नागरिकांना विनाकारण बाहेर न पडण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. वाद पेटला! छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर बसवला रायन्ना यांचा पुतळा दरम्यान, पाऊसमान चांगलं असंल तर सर्वसाधारणपणे ऑगस्ट महिन्यात राज्यातली बहुतांश धरणं भरून वाहू लागतात आणि सांगली, कोल्हापूरसारख्या ठिकाणी पूर परिस्थिती निर्माण होते. पण यंदा मात्र, जुलै महिन्यात वरूणराजाने मोठा ब्रेक घेतल्याने पुणे-मुंबईवर पाणीकपातीचं संकट दिसू लागलं होतं. पण ऑगस्ट महिना सुरू होताच मान्सूनने सर्वदूर बँटिग सुरू केली आहे. ‘महिलांना माझ्याकडे पाठवून कपडे फाडून घेतले’, तुकाराम मुंढे यांचा धक्कादायक आरोप जुलै महिन्यात दडी मारलेल्या पावसाने ऑगस्टमध्ये मात्र जोरदार बँटिग सुरू केली. काही आठवड्यांआधी झालेल्या पावसाची सरासरीपेक्षा 8 टक्के जास्त पावसाची नोंद करण्यात आली होती. त्यामुळे राज्यातील बहुतांश धरणं बरुन गेली आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात