राज्यात वाद पेटला, एका रात्रीत छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर बसवला रायन्ना यांचा पुतळा

राज्यात वाद पेटला, एका रात्रीत छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर बसवला रायन्ना यांचा पुतळा

गोळी रायान्ना कित्तूर साम्राज्यातील सेनाप्रमुख यांनी हा पुतळा बसवला असल्याची माहिती देण्यात येत आहे.

  • Share this:

बेळगाव, 28 ऑगस्ट : बेळगावमध्ये पुन्हा एकदा पुतळ्यावरून नवा वाद सुरू झाला आहे. पिरणवाडी गावात संगोळी रायान्ना यांचा पुतळा बसवण्यात आला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर रायन्ना यांचा पुतळा बसवल्याने पुन्हा एकदा वादाला सुरूवात झाली आहे. यामुळे पिरनवाडी गावातील मराठी भाषिक हे रस्त्यावर उतरले आहेत.

रायन्ना यांच्या पुतळ्याला मराठी भाषिकांचा तीव्र विरोध आहे. अशात कन्नड संघटनांनी मध्यरात्री 3 वाजता रायन्ना यांचा पुतळा छत्रपती शिवाजी महाराज्यांच्या पुतळ्यासमोर बसवला. संगोळी रायान्ना कित्तूर साम्राज्यातील सेनाप्रमुख यांनी हा पुतळा बसवला असल्याची माहिती देण्यात येत आहे. तर रायन्ना यांचा पुतळा इतर ठिकाणी हलवा अशी मागणी मराठी भाषिक करत आहेत.

'महिलांना माझ्याकडे पाठवून कपडे फाडून घेतले', तुकाराम मुंढे यांचा धक्कादायक आरोप

या सगळ्यामुळे पिरनवाडी गावात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. दरम्यान, याआधीही कर्नाटकातील बेळगावमधील मनगुत्ती गावात पोलिसांना रातोरात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हटवल्याचा वाद पेटला होता. मनगुत्ती इथलं आंदोलन दडपण्यासाठी पोलिसांनी लाठीचार्जही केला होता.

पुण्यात पिकअप आणि टेम्पोची भीषण धडक, अपघातात 4 जण ठार

मनगुत्ती गावामध्ये 9 ऑगस्टला मराठी भाषिक महिलांनी आंदोलन केलं होतं. मात्र, कर्नाटक पोलिसांनी हे आंदोलन मोडून काढत आंदोलकांना पांगवण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे मनगुत्ती गावात तणाव निर्माण झाला होता. छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आहे त्या स्थितीत तात्काळ बसवावा, अशी मागणी यावेळी सीमाभागातल्या मराठी बांधवांनी केली होती.

Published by: Renuka Dhaybar
First published: August 28, 2020, 9:30 AM IST

ताज्या बातम्या