मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

वडिलांनीच संपवला लेकाचा 5 वर्षांचा संसार, सुनेच्या गळ्यावर कुऱ्हाडीने वार करून केलं ठार

वडिलांनीच संपवला लेकाचा 5 वर्षांचा संसार, सुनेच्या गळ्यावर कुऱ्हाडीने वार करून केलं ठार

खरंतर घरातली सून ही लक्ष्मीच्या रुपात येत असते. यासाठी प्रेमविवाह आणि कुटुंबाच्या संमतीने ठरवलेले लग्न असा काहीही विषय नसतो. पण याचाच एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

  • Published by:  Renuka Dhaybar
बीड, 28 ऑगस्ट : प्रेमविवाहाचा रागातून सासऱ्याने सुनेचा कुर्‍हाडीने खून केल्याची धक्कादायक घटना समोरा आली आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली आहे. बीडच्या अंबेजोगाई तालुक्यातील पट्टीवडगाव इथे ही घटना घडली आहे. खरंतर घरातली सून ही लक्ष्मीच्या रुपात येत असते. यासाठी प्रेमविवाह आणि कुटुंबाच्या संमतीने ठरवलेले लग्न असा काहीही विषय नसतो. पण याचाच एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शितल अजय लव्हारे (25) असं हत्या झालेल्या विवाहितेचं नाव आहे. काल रात्री साडेनऊच्या सुमारास कुर्‍हाडीने गळ्यावर वार करून तिचा खून करण्यात आला आहे. शीतलचा जागीच मृत्यू तर सासू गंभीर जखमी झाली असल्याची माहिती देण्यात आली आहे. सगळ्यात धक्कादायक म्हणजे खुनानंतर संशयित सासरा फरार झाला आहे. पुढच्या 24 तासांसाठी हवामान खात्याचा इशारा, राज्यात या भागात मुसळधार पाऊस या प्रकरणाविरोधात बर्दापूर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 5 वर्षापूर्वी शीतलसोबत अजयने प्रेम विवाह केला होता. या विवाहाला अजयचे वडील बाळासाहेब लव्हारे यांचा विरोध होता. अशी प्राथमिक माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे. चालकाचा डोळा लागला अन् गाडी पुलावरून नदीत कोसळली, अपघातानंतरचा भयंकर VIDEO समोर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अजय आणि शीतल हे गेली 5 वर्षे बाहेर राहत होते. मात्र, लॉकडाऊन मुळे गावी आल्यानंतर हा प्रकार घडला असल्याचं सांगण्यात येत आहे. या प्रकरणाचा पोलीस कसून तपास करत असून नातेवाईकांची आणि शेजाऱ्यांची चौकशी करणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. वाद पेटला! छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर बसवला रायन्ना यांचा पुतळा दरम्यान, पोलिसांनी घटनास्थळावरून शितलचा मृतदेह ताब्यात घेतला असून तो शवविच्छेदनासाठी नजिकच्या स्थानिक रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. शितलच्या अशा जाण्यामुळे संपूर्ण कुटुंबावर शोककळा पसरली आहे. तर अवघ्या 5 वर्षातच सुखी संसार वडिलांनीच संपवल्याने अजयलाही मोठा धक्का बसला आहे.
First published:

पुढील बातम्या