कोलकाता, 09 मार्च : 'महिला अश्लील व्हिडीओ बनवताना आणि ड्रग्जचे सेवन करताना घाबरत नाहीत', असे धक्कादायक वक्तव्य भाजपच्या अध्यक्षांनी केले आहे. पश्चिम बंगाल भाजपचे अध्यक्ष दिलीप घोष यांनी रविवारी महिला दिनानिमित्त आयोजित एका कार्यक्रमात असे धक्कादायक वक्तव्य केले. यावेळी त्यांनी, “काही महिला टागोरांच्या गाण्यांवर अश्लील व्हिडीओ तयार करतात, त्यांना ड्रग्जचे सेवन करायला आणि रस्त्यावर भडकाऊ घोषणा देतांना भिती वाटत नाही”, असे वक्तव्य केले. महिला आपला स्वाभिमान, सन्मान, संस्कृती, मूल्ये विसरत आहेत, अशी चिंताही त्यांनी व्यक्त केली.
सुधारित नागरिकत्व कायद्या (CAA) विरोधात आंदोलने करणाऱ्या महिलांवरही घोष यांनी टीका केली. “दिवसभर महिलांना रस्त्यावर बसवले जाते. रस्त्यावर त्यांना ज्या प्रकराची वागणुक दिली जाते ती वाईट आहे. त्या हिंचाराला बळी पडू शकतात”, असेही मत मेदिनीपूरच्या खासदारांनी व्यक्त केले.
वाचा-कोरोनाची दहशत! रिपोर्ट येण्याआधीच धक्क्याने झाला तरुणाचा मृत्यूवाचा-लंडनच्या तरुणीने वृत्तपत्रात दिली जाहिरात म्हणाली, मीच होणार मुख्यमंत्री!विडंबन करणाऱ्या व्हायरल व्हिडीओवर उपस्थित केले प्रश्न
घोष यांनी या कार्यक्रमात महिलांवर केलेल्या या वक्तव्यामुळं त्यांच्यावर देशभरातून टीका केली जात आहे. तर, पश्चिम बंगाल महानगरपालिका कार्यवाह आणि नगरविकास मंत्री फरहद हकीम यांनी 'असभ्य आणि क्रूर' म्हणून घोष यांनी महिलांवर केलेले आरोप आणि त्यांना अपमान वाईट आहे, असे मत व्यक्त केले. काही दिवसांपूर्वी टागोरांच्या गाण्यांवर बंगालमधील एका शाळेत विद्यार्थ्यांनी नृत्य केले होते. हे नृत्य टागोरांचा विडंबन असल्याचे मत घोष यांनी याआधी व्यक्त केले होते.
वाचा-‘चांदमियां पाटीलांच्या छातीत ‘राम’ नाही तर काळे कुट्ट विष ठासून भरलेय’वाचा-राणा कपूरला दुसरा झटका, ED नंतर आता CBI नेही दाखल केला गुन्हा
Published by:Priyanka Gawde
First published:
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.